शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

By admin | Updated: April 29, 2017 18:27 IST

गावातील दोन तरुणांचा अंत झाल्याने कुसुंबा गावावर शोककळा पसरली आहे

ऑनलाइन लोकमतकुसुंबा, जि. धुळे, दि. 29 -  धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील पांझरा नदी नजीक असलेल्या  पाणीपुरवठाच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या धर्मराज सुरेश शिंदे (वय 21, रा. कुसुंबा ) व कमलेश पंडित चौधरी (21, कुसुंबा) या  तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली.  या घटनेत गावातील दोन तरुणांचा अंत झाल्याने कुसुंबा गावावर शोककळा पसरली आहे. कुसुंबा गावातून गेलेल्या पांझरा नदी पात्रात मेहेरगावला पाणीपुरवठा करणारी 50 फूट खोल विहीर आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास 20 ते 25 तरुण या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. त्याचवेळी धर्मराज शिंदे  व कमलेश चौधरी या तरुणांचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते दोघे बुडत असताना तेथे पोहण्यासाठी गेलेली मुले घाबरून सैरावरा धावत पळून गेली. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. तेव्हा विहिरीच्या बाजूला दोन मुलांचे कपडे पडले होते. तत्काळ ग्रामस्थांनी आपत्कालीन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आपत्कालीन विभागाची टिम घटनास्थळी दाखल झाली. दोघांचे मृतदेह सायंकाळी साडेपाच वाजेनंतर बाहेर काढण्यात  यश आले. धर्मराज व कमलेश यांचे मृतदेह बाहेर काढल्यानंतर शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली.