जळगावात फटाक्याच्या कंपनीत स्फोट होऊन दोन कामगार ठार

By Admin | Updated: May 2, 2017 16:40 IST2017-05-02T16:40:33+5:302017-05-02T16:40:33+5:30

शामा फायर वर्कस् या फटाक्याच्या कंपनीत मंगळवारी दुपारी 3.30 वाजता स्फोट होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली.

Two workers killed in Jalgaon Fireworks blast | जळगावात फटाक्याच्या कंपनीत स्फोट होऊन दोन कामगार ठार

जळगावात फटाक्याच्या कंपनीत स्फोट होऊन दोन कामगार ठार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि.2 - शिरसोली रस्त्यावरील शामा फायर वर्कस् या फटाक्याच्या कंपनीत मंगळवारी दुपारी 3.30 वाजता स्फोट होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली. 
शिरसोली रस्त्यावरील शामा फायर वर्कस् या कंपनीत फटाके तयार करण्याचे काम होते. मंगळवारी दोन कामगार फटाक्यांमध्ये दारू भरीत असताना अचानक स्फोट झाला. ज्या खोलीत हे काम सुरु होते, त्या खोलीतील साहित्य स्फोटामुळे दूर्पयत फेकले गेले. स्फोटाचा आवाज झाल्याबरोबर आजूबाजूच्या कामगारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोन्ही कामगारांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेत असताना दोघांचे निधन झाले. ज्या खोलीत हा स्फोट झाला त्या ठिकाणी केवळ दोघे कर्मचारी कामाला होते. या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरु आहे.

Web Title: Two workers killed in Jalgaon Fireworks blast