शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
5
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
6
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
7
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
8
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
9
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
10
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
11
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
12
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
13
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
14
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
15
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
16
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
17
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
18
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
19
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
20
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा

विद्यापीठसमोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 8:19 PM

जळगाव - परप्रांतीयांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने पाळधी येथून येणाºया दोघं भावांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेंद्र रमेश पाटील ...

जळगाव- परप्रांतीयांना घेऊन जाणाऱ्या ट्रकने पाळधी येथून येणाºया दोघं भावांच्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महेंद्र रमेश पाटील (वय-३६, दोन्ही रा. पाळधी, ता.धरणगाव) हा दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ समोर झाला. जखमीस शहरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.महेंद्र रमेश पाटील (वय-३६) आणि प्रल्हाद रमेश पाटील (वय-३०, दोन्ही रा. पाळधी ता.धरणगाव) हे दोन्ही भाऊ चहा पावडरचा खेडोपाडी जावून व्यवसाय करतात. रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास बांभोरी येथे कामाच्या निमित्ताने दोघे सोबत वेगवेगळ्या दुचाकीने जात असताना परप्रांतीयांना घेवून जाणाºया ट्रकने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गेट समोर मागून जोरदार धडक दिली. यात महेंद्र पाटील जागीच ठार झाला तर प्रल्हाद पाटील हा गंभीर जखमी झाला.नागरिकांची घटनास्थळी धावदरम्यान, अपघात होताच परिसरातील नागरिक व महामार्गावरील वाहनधारकांनी धाव घेतली. जखमी प्रल्हाद पाटील याला उपचारासाठी शहरातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मयत महेंद्रचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदन करून रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयताच्या पश्चात दोन भाऊ, आई-वडील असा परीवार आहे. अपघातप्रकरणी पाळधी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने एक ठार झाला आहे हे लक्षात येताच ट्रक चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने वाहनचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव