वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 12:22 IST2020-03-15T12:22:04+5:302020-03-15T12:22:41+5:30

एकाला केली मारहाण

Two-wheeler injured in vehicle collision | वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव : यावलकडून किनगावकडे येत असलेल्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना शनिवारी दुपारी किनगाव-साखळी दरम्यान घडली़ यात शफीक सूपडू कुरेशी व सोहम निवृत्ती हिवराळे (दोन्ही रा़ किनगाव) हे दोन जण जखमी झाले आहेत़ त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़
शफीक आणि सोहम हे दोघेही दुचाकीने शनिवारी सकाळी यावल येथे गेले होते़ दुपारी काम संपल्यानंतर दोघेही यावल येथून किनगावच्या दिशेने रवाना झाले़ मात्र, वाटेतच किनगाव-साखळी दरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली़ यात दोघेही रस्त्याच्याकडेला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले़ शफीक याच्या डोक्याला तर सोहम याच्या हाताला तसेच पायाला दुखापत झाली होती़
नागरिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रूग्णालयात नेले व नातेवाईकांना सुध्दा अपघाताची माहिती दिली़ काही वेळातच नातेवाईकांची जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांची गर्दी झाली होती़ तर जखमी मुलांना पाहून कुटूंबीयांचे डोळे पाणावले होते़
एकाला केली मारहाण
अपघाताची माहिती जखमींच्या कुटूंबीयांसह नातेवाईक व मित्र मंडळींना कळताच त्यांनी जिल्हा रूग्णालयात एकच गर्दी केली़ या गर्दीतच काही गोंधळ होवून एकाला मारहाण झाल्याचाही प्रकार घडला़ तसेच शफीक आणि सोहम या दोघांवर जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आलेले आहे़

Web Title: Two-wheeler injured in vehicle collision

टॅग्स :Jalgaonजळगाव