शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

एटीएम लांबविणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:57 PM

जळगाव : एटीएम मशीन ट्रॅक्टरला बांधून लांबविणे व मशीन फोडून त्यातील रोकड लांबविणाºया टोळीतील दोन सदस्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे ...

जळगाव : एटीएम मशीन ट्रॅक्टरला बांधून लांबविणे व मशीन फोडून त्यातील रोकड लांबविणाºया टोळीतील दोन सदस्यांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. भुरा बाळु गायकवाड (२५) व आनंद गुलाब धुडकर (२५) रा. भिलाटी, ता.बोदवड अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिसांनी बोदवडमधील तब्बल ५० एकर जंगल पिंजून काढले. दरम्यान, या टोळीतील आणखी सात जण फरार आहेत.जामठी, ता.बोदवड येथे १३ जानेवारीच्या रात्री टाटा इन्डीकॅश कंपनीचे एटीएम मशीन लांबविण्याचा प्रयत्न झाला होता, तर त्याच दिवशी एटीएमच्या शेजारीच संदीप माळकर यांच्या मालकीच्या पानटपरीचे कुलुप तोडून टपरी मधील पान मसाला व सिगारेटचा साठा लांबविण्यात आला होता. तसेच आदल्या दिवशी बोदवड शहरातील शांतीलाल पुखराज जैन यांच्या मालकीचा १ लाख ३६ हजार रुपये किमतीचे मका मार्केट यार्डमधून लांबविण्यात आला होता. याप्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल होता.तलावाकाठी दारु अन् धिंगाणाएटीएम मशीन व मका लांबविणाऱ्यांमध्ये बोदवडमधीलच ९ जणांची टोळी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक पाटील यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्याशी याबाबत चर्चा करुन पथक स्थापन केले. सहायक फौजदार अशोक महाजन,राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, अनिल जाधव, सुधाकर अंभोरे, दीपक पाटील, अशरफ शेख, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर , दादाभाऊ पाटील, दीपक छ.पाटील, अशोक पाटील तसेच विजय पाटील व नरेंद्र वारुळे अशांना बोदवड मुक्ताईनगर परिसरात रवाना केले होते. यातील दोन जण उजनीच्या जंगलात तलावाकाठी दारु पिवून धिंगाणा घालत असल्याची माहिती मिळताच पथकाने मोर्चा वळविला.एटीएममध्ये २५ लाखाची असल्याची माहिती; निघाले ३ हजारजामठी येथील एटीएम मशीनमध्ये २५ लाख रुपये असल्याची माहिती या टोळीला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी ट्रॅक्टर, कुदळ, टीकम, फावडे व साखळदंड असे साहित्य नेवून मशीन उखडण्याचा प्रयत्न केला, मात्र गावकरी जागे झाल्याने त्यांनी तेथून पळ काढला. या मशीनमध्ये फक्त तीन हजार रुपये असल्याचे निष्पन्न झाले होते.आणखी सात नावे उघडपोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी एटीएम व मका लांबविल्याची कबुली दिली, त्याशिवाय या गुन्ह्यात शंकर जंगलु ठाकरे, गोविंदा अर्जुन गायकवाड, आकाश हरचंद गायकवाड, सदाशिव पंढरी पवार, किसन उर्फ शेंडया कैलास सोनवणे, किसन संजय मोरे, प्रविण सुकलाल घुडकर यांचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांनी ट्रॅक्टर सोबत नेऊन कुदळीने जमिन खोदून एटीएम मशीनचओढून नेण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव