चाळीसगावाजवळ आढळली बिबट्याची दोन पिल्ले, वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात दृश्य कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 15:18 IST2021-11-09T15:17:45+5:302021-11-09T15:18:17+5:30
leopard cubs : वडगाव लांबे शिवारात प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असतांना मजुरांना सात रोजी बिबट्याची दोन पिल्ले दिसली.

चाळीसगावाजवळ आढळली बिबट्याची दोन पिल्ले, वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात दृश्य कैद
चाळीसगाव : चाळीसगाव शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावरील वडगाव लांबे शिवारात ऊसतोड मजुरांना बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली, अशी माहिती चाळीसगाव वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.
वडगाव लांबे शिवारात प्रकाश नीळकंठ पाटील यांच्या शेतात ऊसतोडणी सुरु असतांना मजुरांना सात रोजी बिबट्याची दोन पिल्ले दिसली. वनविभागास याची खबर लागताच अधिकाऱ्यांनी मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, विवेक देसाई यांच्यासह परिसराची पाहणी केली. यात एकच पिल्लू आढळून आले. एक पिल्लू मादी घेऊन गेली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
वनपाल जी.एस.पिंजारी, वनरक्षक एम.बी.चव्हाण, एस.एच.जाधव, वाय.के.देशमुख, आर.आर.पाटील, वनमजूर बाळू शितोळे, श्रीराम राजपूत, भटू अहिरे, संजय गायकवाड, राहुल मांडोळे यांनी यासाठी सहकार्य केले.
दुसरे पिल्लू नेल्याचे कॅमेऱ्यात कैद
आढळलेले पिल्लू सुरक्षितरित्या एका कॅरेटमध्ये ठेऊन दोन ठिकाणी वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले. यावेळी कॅमेऱ्या पिल्लू असलेल्या कॕरेटच्या अवतीभोवती मादी फिरत असल्याचे कैद झाले. दुसऱ्या दिवशी हा परिसर निर्मनुष्य केला असता मंगळवारी सकाळी ट्रॅप कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली. यात मादी असलेली आई आपल्या पिलाला घेऊन जात असल्याचा प्रसंग कैद झाला आहे.