सोलापूरच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपड्यात अटक, गुलाबराव पाटील यांच्या नातेवाइकालाही गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 22:39 IST2024-01-19T22:37:17+5:302024-01-19T22:39:28+5:30
Jalgaon Crime News: अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा बनाव करून गुटखा विक्रेत्यांकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण पोलिस आहे. तर तिसरा पसार झाला आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.

सोलापूरच्या दोन तोतया अधिकाऱ्यांना चोपड्यात अटक, गुलाबराव पाटील यांच्या नातेवाइकालाही गंडवले
- जय सोनवणे
चोपडा (जि.जळगाव) : अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचा बनाव करून गुटखा विक्रेत्यांकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातील एक जण पोलिस आहे. तर तिसरा पसार झाला आहे. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला.
निलंबित पोलिस कर्मचारी राहुल शिवाजी देवकाते (३५, रा. साकटी रोड, पंढरपूर, जि. सोलापूर) आणि विनायक सुरेश चवरे (३५, रा. गोविंदपुरा, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील देवकाते हा निलंबित पोलिस कर्मचारी असून त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. गुन्हा दाखल करू नये, यासाठी आरोपींकडून प्रयत्न करण्यात येत होते. आरोपींकडील चारचाकी वाहनावरही बनावट वाहन क्रमांक आढळून आला आहे. जितेंद्र गोपाल महाजन (२८, रा. लोहियानगर, चोपडा) यांच्या फिर्यादीवरुन चोपडा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तरडी (ता. शिरपूर) येथील नातेवाइकांनाही या तोतया अधिकाऱ्यांनी एक लाखात फसविल्याची माहिती पोलिसांनी दिली.