बांधकामचे दोन अभियंते एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:21 IST2021-07-07T04:21:15+5:302021-07-07T04:21:15+5:30

अमळनेर तालुक्यातील आदिवासी वसतिगृहाचे बांधकामाचे काम नंदुरबार येथील बांधकाम कंपनीला देण्यात आले होते. त्यांच्याकडून धुळे येथील बांधकाम कंपनीला करार ...

Two construction engineers in ACB's net | बांधकामचे दोन अभियंते एसीबीच्या जाळ्यात

बांधकामचे दोन अभियंते एसीबीच्या जाळ्यात

अमळनेर तालुक्यातील आदिवासी वसतिगृहाचे बांधकामाचे काम नंदुरबार येथील बांधकाम कंपनीला देण्यात आले होते. त्यांच्याकडून धुळे येथील बांधकाम कंपनीला करार करून देण्यात आले होते. त्या कामाचे प्रलंबित बिल काढण्यासाठी उपविभागीय अभियंता वर्ग १ दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधलीकर यांनी ठेकेदाराकडून २ लाख ५८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ठेकेदाराने धुळे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे ८ जून २०२१ रोजी तक्रार केली होती. त्यानुसार चौकशी करून लाचलुचपत विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील कुऱ्हाडे, प्रकाश झोडगे, मनजितसिंग चव्हाण व जयंत साळवे, कैलास जोहरे, शरद काटके, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, पुरुषोत्तम सोनवणे, संदीप कदम, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, महेश मोरे, सुधीर मोरे, गायत्री पाटील यांच्या पथकाने दिनेश पाटील यांना सकाळी धुळ्याहून त्यांच्या निवासस्थानी, तर सत्यजित गांधलीकर यांना अमळनेर येथील कार्यालयातून अटक केली आहे. उशिरापर्यंत विविध ठिकाणी तपासणी सुरू होती व लाचलुचपत प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

----फोटो धुळे मॅट पाच

Web Title: Two construction engineers in ACB's net