सोशल मिडियावरील चर्चेने अनेकांच्या काळजाचा चुकला ठेका; प्रशासनाचीही धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 04:28 PM2020-09-28T16:28:55+5:302020-09-28T17:12:01+5:30

०१०७२ अप् कामयानी एक्स्प्रेस ही भुसावळहून मुंबईकडे जात असताना शिरसोली व म्हसावदच्या दरम्यान या रेल्वेचे दोन डबे घसरले. डबे घसरून पडल्याने मोठा आवाज झाला, अशी माहिती आली

Two coaches of Kamayani Express derailed; Accident at Kurhadda near Jalgaon | सोशल मिडियावरील चर्चेने अनेकांच्या काळजाचा चुकला ठेका; प्रशासनाचीही धावपळ

सोशल मिडियावरील चर्चेने अनेकांच्या काळजाचा चुकला ठेका; प्रशासनाचीही धावपळ

Next

जळगाव : भुसावळहून मुंबईकडे जाणाऱ्या  कामयानी एक्स्प्रेसचे दोन डबे सोमवारी दुपारी ३.३० वाजता रुळावरून घसरून अपघात झाल्याची माहिती मिळाली आणि प्रशासनासह साऱ्यांचीच धांदल उडाली. अनेक प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी रवाना झाले अन् त्याठिकाणी पोहोचल्यावर रेल्वेचे हे मॉकड्रील असल्याचे समोर आले आणि त्यानंतर साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. 

०१०७२ अप् कामयानी एक्स्प्रेस ही भुसावळहून मुंबईकडे जात असताना शिरसोली व म्हसावदच्या दरम्यान या रेल्वेचे दोन डबे घसरले. डबे घसरून पडल्याने मोठा आवाज झाला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य सुरु केले आहे, अशी माहिती जळगाव शहर आणि परिसरात वाºयासारखी पसरली आणि प्रशासनाची एकच धावपळ उडाली. नुकसान किती झाले, कितीजण जखमी झाले, याबाबत कोणतीच निश्चित माहिती मिळत नव्हती. उलट जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात येत असल्याचा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होऊ लागल्याने अनेकांच्या काळजाचा ठोकाच चुकला.

दरम्यान, ही कोविड स्पेशल रेल्वे होती. भुसावळ येथून  काही प्रशासकीय अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणी गेल्यानंतर हे मॉकड्रील असल्याचे समजले अन् साऱ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला.

Web Title: Two coaches of Kamayani Express derailed; Accident at Kurhadda near Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे