चोपडा येथून दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:34 IST2019-11-12T22:33:23+5:302019-11-12T22:34:58+5:30
जळगाव - चोपडा येथून अट्टल चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आहे़ शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी ...

चोपडा येथून दोघांना अटक
जळगाव- चोपडा येथून अट्टल चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आहे़ शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी व संजय पांडूरंग बाविस्कर (रा़ हातेड ता़ पाचोरा) असे संशयितांची नावे आहेत़
या दोघांची कसून चौकशी केली असता एक मोटारसायकल, संगणक व टीव्ही त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने, किरण धनगर, प्रवीण हिवराळे, दीपक शिंदे, दादाभाऊ पाटील, प्रमोद लाडवंजारी, महेश पाटील आदींनी केली आहे़