शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
3
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
4
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
5
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
6
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
7
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
8
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
9
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
10
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
11
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
12
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
13
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
14
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
15
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
16
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
17
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
18
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
19
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
20
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

मोटारसायकलला ट्रकची धडक, पिता-पुत्र जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:49 IST

भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरात ठोस मारल्याने मोटारसायकल वरील करगाव तांडा नंबर दोन मधील दोघे पिता -पुत्र जागीच ठार झाले आहे

ठळक मुद्देभोरस फाट्याजवळील घटनाट्रक चालकाविरुद्ध गुन्हाभोरस चौफुली मृत्यूचा सापळा झाला

चाळीसगाव-रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरात ठोस मारल्याने मोटारसायकल वरील करगाव तांडा नंबर दोन मधील दोघे पिता -पुत्र जागीच ठार झाले आहे. ही घटना २४ रोजी रात्री दहा वाजता चाळीसगाव-धुळे रोडवरील भोरस फाट्याजवळ घडली आहे.या घटनेने करगावतांडा येथे शोककळा पसरली आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या अपघातात करगाव तांडा नंबर दोन येथील शेतकरी समिष राठोड (५७) व मुलगा राकेश सतीश राठोड या दोघांचा मृत्यू झाला आहे.
भोरस शिवारात सत्यम जिनिंगच्या पाठीमागे असलेल्या शेतजमिनीत रात्रीची लाईट असल्याने पिकाना पाणी भरण्यासाठी शेतकरी सतीश राठोड व मुलगा राकेश राठोड हे दोघेही मोटारसायकलने जात होते.भोरस फाट्यावर त्यांच्या मोटारसायकलला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने मोटारसायकलला जोरात धडक मारली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. त्यात त्यांना जबर मर लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक अपघाताची माहिती खबर न देता पळून गेला. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी सांगितल्यावरुन हा ट्रक (एमएच ०५ के ९६८१) असा असून त्या ट्रकचालकाविरुध्द गोकुळ राठोड यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे करीत आहे. दरम्यान, या ट्रकचालकाची माहिती संबंधित विभागाकडून तपास कार्य सुरू केले असून लवकरच आरोपीस अटक करू, असे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे यांनी सांगितले. दोघांवर दसऱ्याच्या दिवशी एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे करगावात दसरा सण साजरा झाला नाही.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वरील धुळे रोडवरील भोरस फाटा हा मृत्युचा सापळा ठरत आहे. या फाट्याजवळ अनेक छोटे-मोठे अपघात होत आहे. फाट्याच्या आजूबाजूला स्पीड ब्रेकर नसल्याने वाहने वेगाने जात असल्याने अपघात होत असतात.संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातChalisgaonचाळीसगाव