काळाने घातली झडप! धरणगाव नजीक भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 06:55 PM2020-12-02T18:55:30+5:302020-12-02T18:56:10+5:30

Accident : अपघातातील जखमींना शिवसेना कार्यकर्ते मोतीलाल पाटील यांनी  आपल्या वाहनातून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले.

Three youths killed in a tragic accident near Dharangaon | काळाने घातली झडप! धरणगाव नजीक भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू 

काळाने घातली झडप! धरणगाव नजीक भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू 

Next
ठळक मुद्देसुना मोहनलाल भिलाला ( २३, रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला तर नारायण लालसिंग बारेला (२०) व दिलीप बारेला (२५ दोन्ही रा. साळवा) यांना दवाखान्यात नेत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. 

धरणगाव जि. जळगाव : दोन दुचाकींना समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. यात तीन तरुण ठार झाल्याची घटना धरणगावपासून जवळच असलेल्या निशाणे फाट्याजवळ बुधवारी सकाळी ७.३० वाजता घडली. यात तीन जण जखमी झाले आहेत. हे सर्व कापूस जिनिंगमध्ये मजून  होते. सुना मोहनलाल भिलाला ( २३, रा. मध्य प्रदेश) हा जागीच ठार झाला तर नारायण लालसिंग बारेला (२०) व दिलीप बारेला (२५ दोन्ही रा. साळवा) यांना दवाखान्यात नेत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. 


अपघातातील जखमींना शिवसेना कार्यकर्ते मोतीलाल पाटील यांनी  आपल्या वाहनातून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉ. गिरीष चौधरी यांनी प्राथमिक उपचार केले. त्यावेळी रुग्णालयात एकच गर्दी उडाली होती. नारायण बारेला, दिलीप बारेला, पिंकी मूहलाल भिलाला (२२), संगीता सिताराम भिलाला ( १४ दोघे रा. मध्य प्रदेश), भरत बारेला (२५ रा. साळवा), या पाच जणांवर उपचार करुन जळगावला पाठविण्यात आले. वाटेतच  नारायण  व दिलीप बारेला यांचा मृत्यू झाला.  हे सर्व कापूस जिनिंग मध्ये काम करणारे मजूर असल्याचे कळते.
 

Web Title: Three youths killed in a tragic accident near Dharangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.