बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्ष कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 21:18 IST2019-08-19T21:18:22+5:302019-08-19T21:18:30+5:30

अमळनेर : चार वर्षाच्या बलिकेला शेतात नेऊन अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या पारोळा तालुक्यातील चहुत्रे येथील आरोपीस न्या.राजीव पांडे यांनी ...

Three years imprisonment for child molestation | बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्ष कारावास

बालिकेवर अत्याचारप्रकरणी आरोपीस तीन वर्ष कारावास



अमळनेर : चार वर्षाच्या बलिकेला शेतात नेऊन अश्लील कृत्य करायला लावणाऱ्या पारोळा तालुक्यातील चहुत्रे येथील आरोपीस न्या.राजीव पांडे यांनी ३ वर्षांची शिक्षा सुनावली.
पारोळा तालुक्यातील चहुत्रे येथील अल्पवयीन मुलगी १४ सप्टेंबर २०१६ रोजी अंबिकामातेच्या मंदिराजवळ खेळत होती. त्यावेळी भुश्या उर्फ भूषण ताराचंद पाटील याने तिला कपाशीच्या शेतात नेऊन अश्लील कृत्य करायला लावले व तिचा विनयभंग केला. मुलीने घडलेला प्रकार आईला संगितला. त्यानंतर पारोळा पोलीस स्टेशनला भूषणविरुद्ध भादंवि ३५४, तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक आर.जी.दहिहंडे यांनी तपास केला.
हा खटला अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील अ‍ॅड.किशोर बागुल यांनी ८ साक्षीदार तपासले. न्या.राजीव पांडे यांनी पीडित मुलगी व डॉ.सुरेश पाटील यांची साक्ष ग्राह्य धरून १९ रोजी आरोपीस ३ हजार रुपये दंडासह तीन वर्षांची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून भामरे तर केस वॉच म्हणून योगेश पाटील यांनी काम पाहिले.

 

Web Title: Three years imprisonment for child molestation