Three seriously injured in a car-two-wheeler accident near Pahur | पहूरजवळ कार-दुचाकी अपघातात तिघे गंभीर

पहूरजवळ कार-दुचाकी अपघातात तिघे गंभीर

ठळक मुद्देऔरंगाबाद-जळगाव महामार्गावर हिवरी फाट्यानजीक घटना

लोकमत न्यूज नेटवर्क पहूर, ता. जामनेर : औरंगाबाद-जळगाव महामार्गावर हिवरी फाट्यानजीक कार व दुचाकी अपघातात पहूर येथील तीनजण गंभीर जखमी झाले असून त्यांना पाचोरा येथे उपचारास्तव पाठवण्यात आले आहे. पहूर येथील आलीम युसूफ तडवी, ताहीर कालू तडवी व आरीफ आयुब तडवी दुचाकीवरून पहूरकडे येत होते. पहूरकडून वाकोदकडे कार जात होती. हिवरी फाट्यानजीक कारचालकाने दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरूद्ध बाजूला जावून येणाऱ्या दुचाकीला उडविले व रस्त्याच्याकडेला कार आदळल्याचे युवकांनी सांगितले. यात या युवकांना पहूर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा, वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रवाना केले. रुग्णालयात जमाव जमल्याने पोलीस निरीक्षक राहूल खताळ, पोलीस कर्मचारी शशिकांत पाटील, नवल हटकर, ईश्वर देशमुख यांनी काहींना लाठीचा प्रसाद दिल्यानंतर जमाव पांगला. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात काही नोंद पोलीसात नव्हती.

Web Title: Three seriously injured in a car-two-wheeler accident near Pahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.