सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2024 09:40 IST2024-08-04T09:39:55+5:302024-08-04T09:40:12+5:30

ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी ३:३०  वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत...

Three people drowned the temptation to swim in the dam killed them  | सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

सख्ख्या भावांसह तीन जणांचा बुडून मृत्यू, धरणात पोहण्याचा मोह बेतला जीवावर 

पारोळा (जि. जळगाव) :   तालुक्यातील भोकरबारी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांसह तीन जणांचा बुडून मृत्यू झाला. यातील दोन सख्खे भाऊ आहेत. तर तिसरा त्यांचा आतेभाऊ आहे. ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी ३:३०  वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण बचावले आहेत.
   
  मोहम्मद एजाज नियाज मोहम्मद मोमीन (१२), मोहम्मद हसन नियाज मोहम्मद मोमीन (१६,  दोघे रा. बडा मोहल्ला, पारोळा) आणि आवेश रजा मोहम्मद जैनुद्दीन (१४, रा. रा. मालेगाव, जि. नाशिक) अशी मृत मुलांची नावे आहेत.  यातील एजाज आणि हसन हे दोघे सख्खे भाऊ तर आवेश हा त्याचा आतेभाऊ होता.  तो  मालेगावहून येथे आला होता.
 

Web Title: Three people drowned the temptation to swim in the dam killed them