शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दुर्दैवी! अपघात की आत्महत्या, दीड वर्षाच्या चिमुकलीसह पालकांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 20:00 IST

रेल्वे अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, मयतात रेल्वे कर्मचारी, पत्नी या दीड वर्षाच्या मुलाचा समावेश

ठळक मुद्दे आत्महत्येच्या प्रकाराबद्दल पोलिसांकडून तूर्त इन्कार रेल्वे कर्मचार्‍यांसह पत्नी व दीड वर्षाच्या मुलगी यांचा साकेगाव रेल्वे कॅबिनजवळ रेल्वे अपघातात मृत्यू झाला.

वासेफ पटेल 

भुसावळ : शहराजवळील साकेगाव येथील मूळ रहिवासी व सध्या भुसावळ येथील मोहीतनगरमध्ये राहणारे रेल्वे कर्मचार्‍यांसह पत्नी व दीड वर्षाच्या मुलगी यांचा साकेगाव रेल्वे कॅबिनजवळ रेल्वे अपघातातमृत्यू झाला. बुधवारी सकाळी नऊला ही घटना घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०१७ मध्ये लग्न झालेले मूळचे साकेगाव येथील वाघोद गल्लीतील रहिवासी व रेल्वे कर्मचारी हरीश शिरीष चौधरी (३६), त्यांची पत्नी जयश्री (२७) आणि दीड वर्षांचा मुलगी गुंजन  हे २ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुचाकी (क्रमांक एमएच-१९-६५११) ने रेल्वे लाईनच्या बाजूला कॅबिनजवळ लावून रेल्वेलाईन क्रॉस करत होते. तेव्हा अचानक आलेल्या रेल्वेने यातील जयश्री या गुंजन या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना रेल्वे खांबा क्रमांक ४३८/२२ ए जवळ घडली. तर हरीश चौधरी यांचे दोन्ही पाय कापले गेले. त्यांना उपचारार्थ ॲम्बुलन्स घटनास्थळी आणावयास उशीर झाल्याने उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलविण्यात थोडा उशीर झाला. यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.साकेगाव ग्रामस्थांचा आक्रोशघटनेची माहिती समजताच पूर्ण साकेगाव रेल्वे केबिनजवळ जमा झाले. ॲम्बुलन्स आणा, कुणीतरी जीव वाचवा अशी आरडाओरड घटनास्थळी सुरू झाली, मात्र साकेगावची ग्रामपंचायत मालकीची ॲम्बुलन्स गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त असल्यामुळे व रेल्वेची ॲम्बुलन्स आणावयास उशीर झाल्याने उपचारादरम्यान हरीश चौधरी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनेमुळे साकेगावात प्रचंड शोककळा पसरली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने साकेगावात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. साकेगावची नादुरुस्त ॲम्बुलन्स त्वरित दुरुस्त करण्याची मागणीही यावेळी संतप्त स्वरात नागरिकांनी केली.तालुका व रेल्वे पोलीस घटनास्थळीघटनेची माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांच्यासह तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच रेल्वेचे पोलीस निरीक्षक दिनेश नायक हे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह रेल्वे रूळावरून उचलण्यात आले. निरीक्षक पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, विजय पोहेकर यांनी तत्परता दाखवत ॲम्बुलन्सची व्यवस्था करून जखमी हरीशला उपचारार्थ रुग्णालयात हलविले.घटनास्थळावरून साहित्य जप्तदरम्यान, रेल्वे रुळावर अपघाती निधनानंतर तेथे त्यांचे काही साहित्य, सोन्याची अंगठी, फोटो, शासकीय कागदपत्र सापडले असून, ते पोलिसांनी जप्त केले आहे. मात्र यातून संशयास्पद कुठलीही चिट्ठी वगैरे मिळालेली नाही.दरम्यान हरीश हा यांचे वडील शिरीष वामन चौधरी यांच्या जागेवर रेल्वेत सेवेत लागला होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या बहिणीचाही मृत्यू झाला होता. एकुलत्या एक हरीशच्या पश्चात रेल्वेतून सेवानिवृत्त झालेले वडील, आई असा परिवार आहे. पत्नी ही जळगाव येथील खोटेनगर भागातील माहेरवासी आहे.घटनास्थळी साकेगाव येथील संदीप चौधरी, अजय चौधरी, विनोद परदेशी, दिलीप पाथरवट यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी मदतकार्य केले. तसेच घटना घडताच रेल्वेचे मुकरदम आनंद गंगादिव यांच्या माहितीवरून रेल्वे कर्मचारी शेख गफूर शेख कालू, दीपक पाटील, भूषण बरहाटे यांनीसुद्धा घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले.

टॅग्स :railwayरेल्वेJalgaonजळगावPoliceपोलिसDeathमृत्यूAccidentअपघातSuicideआत्महत्या