शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

महाजनांसह वसाकाचे तीन संचालक भाजपत जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 8:03 PM

धुळ्यात आज सोहळा : इतर पदाधिकारीही सोबत

न्हावी, ता. यावल / फैजपूर : कॉँग्रेस नेते, माजी मंत्री जे. टी. महाजन यांचे पुत्र व मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांनी कॉँग्रेस सदस्यत्वाचा व जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा देत मंगळवारी धुळे येथे भाजपा प्रवेशाचे संकेत दिले आहेत. या संदर्भातील चर्चेस त्यांनी दुजोरा दिला आहे.शरद महाजन हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून होती. महाजन यांनीही कार्यकर्त्यांच्या इच्छेचे कारण सांगून लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. त्यांच्या या भूमिकेने कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली होतीजे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत धुळे येथे प्रवेश सोहळामंगळवारी धुळे येथे भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनराथराव खडसे आदी नेत्यांच्या उपस्थितीत शरद महाजन यांनी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.यावेळी त्यांच्यासोबत न्हावी ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती नितीन चौधरी, उपसरपंच सतीश जंगले तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन प्रितेश पाटील, व्हाईस चेअरमन सुधाकर चौधरी तसेच सर्व संचालक व सर्व सदस्य, याचबरोबर फ्रुट सेल सोसायटीचे सर्व सदस्य, न्हावी शिक्षक प्रसारक मंडळाचे चेअरमन मिलिंद महाजन तसेच संचालक मंडळाचे सदस्य, न्हावी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन नितीन चौधरी, व्हाईस चेअरमन पराग वाघुळदे तसेच सर्व संचालक व म .सा. का .व्हाईस चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे तसेच काही संचालक भाजपत प्रवेश करणार आहेत.

भाजपात प्रवेशाचा निर्णय झाला आहे. कार्यकर्त्यांची इच्छा होती. कॉँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदाचा तसेच सदस्य पदाचा आपण राजीनामा दिला आहे.- शरद महाजन, मसाका चेअमन.