म्हस्वे येथे एकाच दिवशी तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 22:57 IST2021-06-22T22:56:50+5:302021-06-22T22:57:27+5:30

पारोळा तालुक्यातील म्हस्वे येथे दिनांक २१च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांमध्ये घरफोड्या केल्या.

Three burglaries on the same day in Mhaswe | म्हस्वे येथे एकाच दिवशी तीन घरफोड्या

म्हस्वे येथे एकाच दिवशी तीन घरफोड्या

ठळक मुद्देअज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : तालुक्यातील म्हस्वे येथे दिनांक २१च्या मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी तीन घरांमध्ये घरफोड्या करून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

शेषराव तुकाराम पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली आहे. दिनांक २१ रोजी जेवण करून गच्चीवर झोपण्यास गेलो असता मध्यरात्रीच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा प्रवेशद्वाराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व घरात असलेल्या कपाटातील मंगल पोत व दागिने सुमारे ४१ हजार रुपयाचे चोरून नेल्याची घटना घडली.

गावातील रोहिदास भगवान पाटील यांच्या घरातील सोन्याची मंगल पोत व रोख रक्कम रुपये अठ्ठेचाळीस हजाराची व धनराज निंबाजी पाटील यांच्या घरातील बारा हजार रुपये रोख व बारा हजार रुपये रकमेची सोन्याचे दागिने असे एकूण १ लाख १२ हजार रुपयाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे.

याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Three burglaries on the same day in Mhaswe