जळगाव : माजी मंत्री गिरीश महाजन व रामेश्वर नाईक यांच्यासोबत अनेक वर्षे असल्याने त्यांची अनेक गुपिते आपल्याजवळ आहेत. मात्र भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्याने दोघांकडून आपल्याला ठार मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांची चौकशी करण्याची मागणीही लोढा यांनी केली आहे. तसेच तक्रारीत त्यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावेही घेतली आहेत.
यासंदर्भात ‘लोकमत’ने महाजन यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लोढा हे दर महिन्याला तक्रारी करत असतात. खरंच त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत. लोढा यांनी केलेल्या आरोपावर बोलण्यास रामेश्वर नाईक यांनी नकार दिला.
Web Title: threat to life from Girish Mahajan ncp worker lodged police complaint
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.