एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 10:16 IST2025-10-28T10:15:31+5:302025-10-28T10:16:40+5:30
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता.

एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
प्रशांत भदाणे, जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगरातील बंगल्यात चोरीची घटना घडलीय. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.
एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील शिवराम नगरातील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तळमजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. नेमकं चोरट्यांनी किती मुद्देमाल चोरून नेलाय, ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांच्या सून केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेनंतर आता जळगावातील खडसेंच्या बंगल्यात चोरीची घटना घडली आहे.