७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 05:28 IST2025-10-22T05:26:02+5:302025-10-22T05:28:11+5:30
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीने १४ ऑक्टोबर रोजी १ लाख ९५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता.

७ दिवसांत ३३ हजारांनी घसरला दर; लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ८ हजारांनी गडगडली चांदी!
लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : दोन लाखांच्या घरात पोहोचलेल्या चांदीचे भाव सात दिवसांत तब्बल ३३ हजार रुपयांनी घसरले आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, मंगळवारी तर चांदीच्या भावात आठ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी एक लाख ६२ हजार रुपयांवर आली.
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून भाववाढ होत गेलेल्या चांदीने १४ ऑक्टोबर रोजी १ लाख ९५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यानंतर मात्र, चांदीचे भाव उतरत आहेत.
सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ
चांदीच्या भावात घसरण होत असताना सोन्याच्या भावात मात्र वाढ होत आहे. मंगळवारी सोन्याच्या भावात ६०० रुपयांची वाढ होऊन ते प्रतितोळा १ लाख २९ हजार रुपयांवर पोहोचले.
असे घसरत गेले चांदीचे भाव
दिनांक भाव झालेली घसरण
१४ ऑक्टो. १,९५,००० ———
१५ ऑक्टो. १,८५,००० १०,०००
१६ ऑक्टो. १,७६,००० ९,०००
१७ ऑक्टो. १,७८,००० २,०००+
१८ ऑक्टो. १,७१,००० ७,०००
२० ऑक्टो. १,७०,००० १,०००
२१ ऑक्टो. १,६२,००० ८,०००