Maharashtra Crime: जळगावातील मुलीचे पैसे घेऊन कोल्हापूर येथील तरुणासोबत लग्न लावून दिल्या प्रकरणात मुलीची आईदेखील लग्नाला हजर असल्याचे तपासात समोर आले आहे. मुलीच्या आईलादेखील अटक करण्यात आली व नंतर जामिनावर सुटका झाली. दरम्यान, मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल पोक्सो व इतर कलमांच्या गुन्ह्यात पती आशिष गंगाधरे व मीना जैन या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पैसे आणि सोन्याचे दागिने घेऊन लग्न लावून फसवणूक केल्याप्रकरणी अशोक गंगाधरे याने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात मुलीची आई व मीनाबाई सुरेश जैन (रा. भुसावळ) या दोघांना अटक करण्यात आले.
मीनाबाई जैन हिने मुलीच्या आईला कोल्हापूर येथे लग्नाला नेऊन ती दिराणी असल्याचे सांगितले होते.
वाचा >>आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
तेथे लग्नात मीनाबाईला १२ हजार ५०० रुपये देण्यात आले. पोलिसांनी ते जप्त केले आहे. दोघींना न्यायालयीन कोठडी सुनावली. यात मुलीच्या आईला जामीन मिळाला.
पोक्सोप्रकरणी दोघे ताब्यात
मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात मुलीचा पती आशिष गंगाधरे व मीना सुरेश जैन या दोघांना ताब्यात घेतले आहे.
हरिविठ्ठलनगरातील मुलीचे कोल्हापूर येथील तरुणाशी लग्न लावून दिले व नंतर लग्नासाठी दिलेले पैसे, तसेच सोने परत देण्याचा तगादा लावल्याने मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली होती.
आत्महत्येप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आशिष सदाशिव गंगाधरे, अप्पासाहेब बजरंग गंगाधरे, मीनाक्षी ऊर्फ मनीषा दिनेश जैन व सचिन दादाराव अडकमोल यांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपली. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.