कुजलेल्या अवस्थेत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह!

By सागर दुबे | Updated: April 5, 2023 22:39 IST2023-04-05T22:38:38+5:302023-04-05T22:39:39+5:30

याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाच्या कपड्यावरून नातेवाईकांनी ओळख पटविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

The body of 'that' missing youth was found in a rotten state! | कुजलेल्या अवस्थेत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह!

कुजलेल्या अवस्थेत सापडला बेपत्ता तरुणाचा मृतदेह!

जळगाव : रविवार पासून बेपत्ता असलेल्या रोहिदास प्रकाश सोनवणे (भिल) (३५, रा. मोहाडी, ता. जळगाव) या तरुणाचा मृतदेह सावखेडा शिवारातील स्मशानभूमी जवळील पुलाजवळ बुधवारी सकाळी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाच्या कपड्यावरून नातेवाईकांनी ओळख पटविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे रोहिदास सोनवणे हे आपल्या कुटुंबयासह वास्तव्यास होते. रविवारी संतापाच्या भरात रोहिदास हे घरातून निघून गेले होते. मात्र, खूप वेळ होऊनही ते घरी परतले नसल्याने त्यांच्या कुटुंबयांनी त्यांचा शोध सुरू केला होता. मात्र, ते मिळून आले नव्हते. बुधवारी सकाळच्या सुमारास सोनवणे यांच्या कुटुंबीय सावखेडा शिवारात शोध घेत असताना त्यांना स्मशान भूमीजवळील पुलाजवळ एका पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती तालुका पोलिसांना दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव...
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ. लीलाधर महाजन, वासुदेव मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, कुटूंबियांना मृतदेह आढळून आल्यानंतर त्यांनी त्याच्या अंगावरील कपड्यांवरून तो मृतदेह रोहिदास यांचा असल्याचे ओळखले. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुली असा परिवार आहे.

 

Web Title: The body of 'that' missing youth was found in a rotten state!