शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 17:36 IST

Tipper Hits Bike In Jalgaon: भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.

नानासाहेब कांडलकर, लोकमत न्यूज नेटवर्क:जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाटा येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता भीषण अपघात झाला. भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने दोन चिमुकल्या नातवंडांचा जागीच मृत्यू झाला. तर, आजी-आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी टिप्पर जाळून टाकल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

प्रकाश महादेव खेडकर (६०) आणि साधना प्रकाश खेडकर (५५), रा. पळशी सुपो, ता. जळगाव जामोद हे आपल्या दोन नातवंडांना घेऊन मोटरसायकलवरून शेगावकडे जात होते. माऊली फाट्यानजीक भरधाव वेगाने आलेल्या टिप्पर (क्र. एमएम-२८-बीबी-८४८९) ने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पार्थ अक्षय चोपडे (६), रा. राजापेठ, अमरावती आणि युवराज मोहन भागवत (५), रा. बडनेरा, अमरावती हे दोघे बालक जागीच ठार झाले. अपघातानंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. या आगीत टिप्परचे टायर जळून खाक झाले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक श्रीकांत निचळ, उपनिरीक्षक नारायण सरकटे, राजकुमार कांबळे यांनी पोलीस बंदोबस्तासह तातडीने धाव घेतली. अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी घटनास्थळी पाहणी केली.  जखमींना प्रथम ग्रामीण रुग्णालय, जळगाव जामोद येथे दाखल करण्यात आले. गंभीर जखमी आजीला खामगाव सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. या प्रकरणात टिप्पर चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालकास अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरसीपी पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी पाचारण केले होते. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगावMaharashtraमहाराष्ट्र