शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

‘कुणी उमेदवारी करायची ते सांगा’, गुलाबराव देवकर आणि ज्ञानेश्वर महाजन यांच्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच रंगला सामना

By आकाश नेवे | Updated: October 14, 2022 17:21 IST

Jalgaon News: राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती.

- आकाश नेवेजळगाव - राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती. त्यावर महाजन यांना योग्य तो मानसन्मान दिला जात असल्याचे तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी स्पष्ट केले. मात्र, तरीही महाजन यांच्या तक्रारी संपत नसल्याने जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनाच कुणी उमेदवारी करायची ते सांगा, त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करु, तसेच मला सांगून टाका की, लढवायची की नाही.

ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केली की, ‘तालुकाध्यक्ष कधीही धरणगावला बैठक घेत नाहीत. गुलाबराव देवकर यांनी जळगावला बैठक घेण्यास सांगितले, अशी सबब तालुकाध्यक्ष पुढे करतात. जळगाव तालुक्याचे अध्यक्ष आम्हाला बैठकीला बोलावत नाहीत. प्रमुख नेते असूनही सावत्र वागणूक मिळते. विधानसभा निवडणूक जाऊन तीन वर्षे झाली तरी बैठक झाली नाही. सगळं आलबेल असल्याचे दाखवले जात आहे. कुठल्याही नेमणुकांमध्ये विश्वासात घेतले जात नाही. त्यांनी पुढे जावे. मात्र, आम्हाला मान मिळावा. आम्ही नऊ जण विधानसभेला इच्छुक होतो. त्यांची एकत्र बैठक घ्यावी. गेल्या निवडणुकीत मते कमी का मिळाली, हेदेखील कळायला हवे.’

यावर तालुकाध्यक्ष धनराज माळी यांनी खुलासा करतांना सांगितले की, ‘त्यांना बैठकीला बोलावले जाते. बहुतेक बैठका धरणगावला होतात. जळगाव ग्रामीण मतदारसंघ असल्याने काही बैठका जळगावला होतात.’ जयंत पाटील यांनी काही बैठका धरणगावला घेण्याची आणि सर्व नऊ इच्छुकांना बोलावण्याची सूचना केली.

नंतर गुलाबराव देवकर यांनी सांगितले की, मी सर्व इच्छुकांना सन्मान दिला आहे. जळगाव तालुक्यात महाजन यांनी स्वत: फिरायला हवे. हा विनाकारण ताण आहे. काम करायचे असेल तर मला एकदा सांगून टाका, की कुणी उमेदवारी करायची आहे. त्याच्या नेतृत्त्वात आम्ही काम करू. ही आडकाठी केली जाते. मला सांगून टाका, की लढवायची की नाही. पुढे जाता येईल.’

त्यानंतर जयंत पाटील यांनी हस्तक्षेप करत म्हटले की,‘तालुकाध्यक्षांनी सगळ्यांना बोलावले पाहिजे, कार्यरत नेत्यांना आधीच निरोप देत चला.’

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसJalgaonजळगाव