शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सुनेच्या जाचाने सासूबाईंना अश्रू अनावर

By admin | Updated: November 18, 2014 14:36 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित महिला लोकशाहीदिनी सुनेच्या जाचाने त्रस्त असलेल्या वृध्देला जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्यासमोर कैफीयत मांडताना अश्रू अनावर झाले.

 

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित महिला लोकशाहीदिनी सुनेच्या जाचाने त्रस्त असलेल्या वृध्देला जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्यासमोर कैफीयत मांडताना अश्रू अनावर झाले.
त्या वृध्देच्या पतीचे निधन झालेले आहे. पतीचे पेन्शन त्या वृध्देला मिळते. मात्र त्या पेन्शवरून त्यांची सून त्रास देत आहे. पेन्शनसाठीच त्यांच्या मुलाशी लग्न केल्याचे सांगून पेन्शनची मागणी करते,अशी तक्रार त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे महिला लोकशाहीदिनी केली. याबाबत पोलिसांकडे तक्रार देऊनही त्यांनी साधी विचारपूसही केली नाही,असे सांगत असतानाच त्या वृध्देला अश्रू अनावर झाले. त्यांचे गार्‍हाणे ऐकून घेत जिल्हाधिकार्‍यांनी पोलिसांना त्यांच्या तक्रारीची दखल घेण्याचे आदेश दिले.
लोकशाहीदिनी ४७ तक्रारी
सोमवारी झालेल्या महिला लोकशाहीदिनी एकूण ४७ तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक ४३ तक्रारी ठेवीदारांच्या असून ३ पोलीस आणि १ तक्रार संजय गांधी निराधार योजनेची आहे.
मर्जीतील ठेवीदारांना ठेवी परत
महिला ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळण्याचे साकडे ठेवीदारांनी जिल्हाधिकार्‍यांना घातले आहे. महिलांच्या विविध पतसंस्थांमध्ये ठेवी आहेत. या पतसंस्थांची वसुली आजपर्यंत झालेली नाही काय? शासनाच्या परिपत्रकाचे पालन किती संस्थांनी केले, याबाबत सहकार विभाग लक्ष देत नाही. पतसंस्थांनी परिपत्रकाचे पालन केले असते तर महिलांना रस्त्यावर येण्याची वेळ आली नसती. मोठय़ा प्रमाणावर वसुली होऊनही मर्जीतील ठेवीदारांना ठेवी परत करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला. ठेवी वाटपाची चौकशी करा
ठेवीदारांना परत करण्यात आलेल्या संपूर्ण ठेवींबाबत चौकशी करण्याची मागणी ठेवीदारांनी लोकशाहीदिनी केली आहे. महिला ठेवीदारांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असेल तर केवळ सोपस्कार नको, न्याय हवा. संस्थाचालकांच्या मनमानी कारभाराला वेसण घालण्यासाठी कागदी घोडे नको तर ठोस कारवाई करण्याची मागणी ठेवीदारांनी केली. यावेळी काळा हनुमान, महेश र्मचंट, जय मातादी, चंद्रकांत बढे, स्वामी नारायण, संतोषी माता, जनता अर्बन, कुबेर अर्बन, फैजपूर र्मचंट, आनंद अर्बन, महाकालेश्‍वर, सप्तशृंगी या संस्थांचे महिला ठेवीदार उपस्थित होते, असे संध्या चित्ते यांनी कळविले आहे.