तापी, पांझरा, बोरी, चिखली व माळण नदीजोड प्रकल्प राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 06:37 PM2017-10-16T18:37:03+5:302017-10-16T18:46:15+5:30

अमळनेर मतदारसंघात नेहमी भेडसावणारा पाण्याचा प्रश्न नदीजोड प्रकल्पामुळे सुटण्यास मदत होणार असून यासाठी आमदार शिरीष चौधरींच्या प्रयत्नांना मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

TAPi, Panjhra, Bori, Chikhali and Malan river Jodh projects will be implemented | तापी, पांझरा, बोरी, चिखली व माळण नदीजोड प्रकल्प राबविणार

तापी, पांझरा, बोरी, चिखली व माळण नदीजोड प्रकल्प राबविणार

Next
ठळक मुद्देअमळनेर तालुक्यातील नदी जोड प्रकल्पाचा आराखडा तयारहायड्रोलीक पंपाद्वारे लहान नद्यांमधील पाणी वळविणार

लोकमत ऑनलाईन अमळनेर, दि.16 : अमळनेर मतदारसंघातील पाणी प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आमदार शिरीष चौधरी यांनी जोरदार प्रयत्न सुरु केले असून तापी, बोरी, पांझरा, माळण व चिखली या नद्यांवर नदीजोड प्रकल्प राबविण्याची योजना हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रवींद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून तयार करून मुख्यमंत्री व प्रधान सचिवांना निवेदन दिले आहे. या संकल्पनेला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागास शिफारस केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने 23 ऑगस्ट 2017 रोजी जळगाव जिल्हा नदीजोड प्रकल्पाच्या धोरणाबाबत तसेच त्याचा जिल्हा वार्षिक योजनेत समावेश करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. अमळनेर परिसर हा सतत अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडत असल्याने अनेक गावांना सतत पाणीटंचाई असते. यामुळे याच शासन निर्णयाचा आधार घेऊन हिरा उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. रविंद्र चौधरी यांनी मतदारसंघात विविध नद्या असल्याने त्या हायड्रोलीक रॅम्प पंपद्वारे उपनद्या, बंधारे व पाटचा:यांशी जोडण्याची कल्पना मांडली होती. व त्या अनुषंगाने तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष नद्यांची पाहणी व तांत्रिक माहिती घेत योजनेचा आराखडा तयार केला होता. तर आमदार शिरीष चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे प्रधान सचिव यांना लेखी निवेदन सादर करून हा प्रकल्प राबविणे किती महत्वाचे आहे हे निदर्शनास आणून दिले. यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत शिफारस केली यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्वरित पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागास दिल्या आहेत. या आहेत प्रकल्पनिहाय मागण्या तापी : प्रमुख नदी असलेल्या तापी नदीवर पाडळसे येथे धरण अपूर्ण अवस्थेत असल्याने पावसाळा तसेच इतर   येणारे 95 टक्के पाणी वाया जाते. ते पाणी हायड्रोलीक रॅम्प पंप वापरून कडणी, चिखली, बोरी, माळीण, पांझरा या उपनद्यांना व लहान मोठय़ा पाटचा:यांना जोडून टाकावे. माळीण : माळीण नदीलगत रणाईचे व परिसरातील 25 दुष्काळग्रस्त गावे असून या नदीवर निसर्डी, लोटाबाडगी, गोयर अशी छोटी धरणे व सिमेंट बंधारे आहेत . याठिकाणी माळीण नदीचे पाणी आणता येणे शक्य आहे. पांझरा : पांझरा नदीलगत मांडळ व परिसरातील 30 गावात कायमस्वरूपी पाण्याची तरतूद होण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवावा तसेच नदीच्या संपर्कात येणारे 15 ते 20 सिमेंट बंधा:यात पाणी सोडावे. बोरी : बोरी नदीलगत अमळनेर व पारोळा तालुक्यात भोकरबारी, खळेश्वर, धार पाझर तलाव, जामदे पाझर तलाव, टोकर तलाव, व इंधवे वनक्षेत्र तलाव असून या तलाव व धरणात नदीजोड प्रकल्प राबवून बोरी नदीचे पाणी सोडावे तसेच बोरीची चिखली ही उपनदी असून गिरणा धरणांतर्गत दहीगाव बंधा:याचे पाणी हे नाल्याद्वारे चिखली नदीजवळ वाहते हे पाणी चिखली नदीस जोडल्यास मतदार संघांचा 30 टक्के भाग पाण्याखाली येईल, याप्रमाणे मागण्या आमदार चौधरी यांनी करून यासाठी निधीची तरतूद करावी अशी मागणी केली आहे .

Web Title: TAPi, Panjhra, Bori, Chikhali and Malan river Jodh projects will be implemented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.