मौखिक आरोग्याची काळजी घ्या, जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:17 IST2021-05-26T04:17:49+5:302021-05-26T04:17:49+5:30

जळगाव : कोरोनातून बरे झालेल्यांनी म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मौखिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले ...

Take care of oral health, appeals Collector Raut | मौखिक आरोग्याची काळजी घ्या, जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

मौखिक आरोग्याची काळजी घ्या, जिल्हाधिकारी राऊत यांचे आवाहन

जळगाव : कोरोनातून बरे झालेल्यांनी म्युकरमायकोसिसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मौखिक आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मौखिक आरोग्य कार्यक्रमाची आढावा बैठक जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. नितीन भारती, डॉ. संपदा गोस्वामी, डॉ. गोविंद मंत्री, ज्ञानेश्वर पाटील, गौरव चौधरी, ज्योती गोसावी, सरला पाटील उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, म्युकरमायकोसिसची लक्षणे मौखिक आरोग्याशी संबंधित असल्याने कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आपले दात, जीभ, डोळे, चेहरा, टाळूचा भाग याची काळजी घ्यावी. यात काहीही बदल अथवा लक्षणे जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवून तपासणी करून घ्यावी. तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात मागील वर्षी ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या क्षेत्रातील ११४ शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणाऱ्या २४२ व्यक्तींना ७ हजारांचा दंड करण्यात आला. तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे जिल्हा सल्लागार डॉ. भारती यांनी बैठकीत सांगितले.

Web Title: Take care of oral health, appeals Collector Raut