शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचा प्रवेश झाला तरी सुरेशदादा जैन हेच जिल्ह्यात शिवसेनेचे नंबर एकचे नेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:22 IST

संजय सावंत : जिल्हा बॅँक व दुध फेडरेशनच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणूनच लढणार

जळगाव : भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष सोडतील का नाही? हा निर्णय त्यांनाच करायचा आहे. खडसेंना शिवसेनाच एक चांगला पर्याय असून त्यांच्यामुळे शिवसेनेला बळकटी मिळेल, यात शंका नाही. याबाबतचा निर्णय सेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याशी चर्चा करूनच होणार आहे. तसेच खडसेंचा सेनेत प्रवेश झाला तरी सुरेशदादा जैन हेच जिल्ह्यात सेनेचे नंबर एकचे नेते राहतील, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी ‘लोकमत’ला दिली.संजय सावंत यांनी रविवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक अमर जैन, शिवसेनेचे शहर संघटक दिनेश जगताप आदी उपस्थित होते. माजी मंत्री एकनाथराव खडसे हे मोठे नेते आहेत. तसेच त्यांचा निर्णय घेण्यास ते सक्षम असून, शिवसेनेत त्यांनी प्रवेश केला तर जिल्ह्यात व राज्यात शिवसेनेला नक्कीच बळकटी मिळेल. तसेच त्यांच्या प्रवेशाबाबत सुरेशदादा जैन यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. सुरेशदादा जैन यांच्या दुरदृष्टीमुळे जळगाव शहराचा जो विकास झाला आहे, तो आजही दिसून येतो. १९९५मध्ये युती सरकारच्या काळात सुरेशदादा जैन यांनी जळगाव शहरात राबविलेल्या गृहनिर्माण योजनांचे काम पाहून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेशदादांना गृहनिर्माण मंत्रीपद दिल्याची आठवण त्यांनी यावेळी सांगितली.महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्हास्तरावर राबवणारराज्यात शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस व कॉँग्रेसने महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली आहे. तोच प्रयोग आता जिल्हास्तरावर राबविण्यात येणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. याची सुरुवात जिल्ह्यात आगामी काळात होणाऱ्या जिल्हा बॅँक, दुध फेडरेशन व बाजार समित्यांचा निवडणुकांपासून करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हा प्रयोग केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.शिवसेना संपविण्यासाठी भाजपाने प्रयत्न केलेलोकसभा निवडणुकीत युती म्हणून प्रत्येक शिवसैनिकाने खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांच्यासाठी काम केले. पाचोºयातील शिवसैनिकांवर भाजपा नेतृत्वाने केलेला अन्याय विसरून आमदार किशोर पाटील यांच्यासह सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी भाजपा उमेदवारांसाठी काम केले. मात्र, विधानसभा निवडणुकीत युती असतानाही भाजपाने बंडखोरांना मदत केली. माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कोणत्या बंडखोरांने १६ कोटी रुपये खर्च केल्याचे दिसून आले. भाजपाने जिल्ह्यातील शिवसेना संपविण्यासाठी नको ते प्रयत्न केले. मात्र, शिवसेनेने या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली असल्याचे सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव