जळगाव येथील सुप्रिम कॉलनीत जुगार अड्डयावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 12:51 IST2018-04-07T12:51:47+5:302018-04-07T12:51:47+5:30

सहा जणांना अटक

In the supermarket of Jalgaon, on the gambling side, the forage | जळगाव येथील सुप्रिम कॉलनीत जुगार अड्डयावर धाड

जळगाव येथील सुप्रिम कॉलनीत जुगार अड्डयावर धाड

ठळक मुद्दे१ लाख १२ हजारांचा माल जप्तजुगाराचे साहित्य जप्त

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ७ - सुप्रिम कॉलनी भागातील मासळी मार्केट जवळ मोकळ्या जागेतील जुगार अड्डयावर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता अचानक छापा टाकला. त्यात पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख १२ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
शुक्रवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरूध्द अढाव यांना सुप्रिम कॉलनीत काही तरूण जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, महेंद्र गायकवाड, मनोज सुरवाडे यांच्या पथकाने अड्डयावर छापा टाकला.
अक्षय्यतृतीयेनिमित्त तालुक्यात अनेक गावांमध्ये जुगार अड्डे सुरु झाले आहेत.
रात्री साडे नऊ वाजता यांना केली अटक
बलवीर उर्फ गुल्या बहादूर भाट (वय-२६), राजू आलम सांगळे (वय-३४), प्रकाश वसंत चव्हाण (वय-२४), सोनू रमेश राठोड (वय-१९), अर्जुन विजयसिंग बागडे (वय-२९), ईश्वर मोरसिंग चव्हाण (वय-३२, सर्व रा़ सुप्रिम कॉलनी) या जुगाऱ्यांचा समावेश आहे़
तीन दुचाकी व जुगाराचे साहित्य जप्त
पोलिसांनी या सहाही जुगाºयांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन ते तीन हजार रूपयांची किरकोळ रक्कमेसह जुगार साहित्य आढळून आले़ यासह तीन महागड्या मोटारसायकली जप्त केल्या. किशोर राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: In the supermarket of Jalgaon, on the gambling side, the forage