अधिष्ठातांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:18 IST2021-07-30T04:18:09+5:302021-07-30T04:18:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याच्या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश ...

अधिष्ठातांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी न केल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याच्या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गुरूवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांची भेट घेऊन चर्चा केली. शिवाय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडेही हा मुद्दा मांडला. तरूण मृतावस्थेतच रुग्णालयात दाखल झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
नरेंद्र परदेशी या तरूणाचा बुधवारी मृत्यू झाला. त्याला रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी आमची ड्युटी नसल्याचे सांगत तपासणी केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ.मारोती पोटे यांनी नातेवाईकांची समजूत घातली होती. या प्रकरणात नेमके काय घडले याबाबत चर्चा करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांची भेट घेतली. दरम्यान, प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक
अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी तातडीने सर्व सीएमओंची बैठक घेऊन माहिती जाणून घेतली. बुधवारच्या घटनेनंतर गुरूवारी ही बैठक घेण्यात आली.