संत मिराबाई नगरात तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 16:20 IST2020-11-19T16:18:34+5:302020-11-19T16:20:37+5:30
जळगाव : पिंप्राळा भागातील संत मिराबाई नगरात भाड्याच्या घरात वास्तव्याला असलेल्या प्रदीप सदाशिव महाजन (३२, मुळ रा.कळमसरे, ता.अमळनेर) या ...

संत मिराबाई नगरात तरुणाची आत्महत्या
जळगाव : पिंप्राळा भागातील संत मिराबाई नगरात भाड्याच्या घरात वास्तव्याला असलेल्या प्रदीप सदाशिव महाजन (३२, मुळ रा.कळमसरे, ता.अमळनेर) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. प्रदीप हा बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करायचा. पत्नी दिवाळीसाठी माहेरी गेलेली असताना ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. मात्र घटनास्थळावर चिठ्ठी किंवा इतर काही माहिती मिळालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला माहिती कळविली. कर्मचारी शिवाजी धुमाळ, राहूल पारधी व रवींद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केली व मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. घटनेबाबत प्रदीपच्या गावाला व पत्नीला कळविण्यात आले आहे. चार वर्षापासून तो पत्नीसह संत मिराबाई नगरात वास्तव्याला होता.