शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

ॲन्जीओप्लास्टी झालेल्या वृद्धावर म्युकरची यशस्वी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फुफ्फुस ३८ टक्के काम करीत असताना त्यातच उच्च रक्तदाबासह ॲन्जीओप्लास्टी झालेल्या ७० वर्षीय वृद्धावर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : फुफ्फुस ३८ टक्के काम करीत असताना त्यातच उच्च रक्तदाबासह ॲन्जीओप्लास्टी झालेल्या ७० वर्षीय वृद्धावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसची शस्त्रक्रिया करून या रुग्णाला बरे करण्यास डॉक्टरांच्या पथकाला यश आले आहे.मंगळवारी ही अतिजोखमीची शस्त्रक्रिया पार पडली.

अयोध्यानगरातील एका ७० वर्षीय रुग्णाच्या हृदयाची क्षमता वाढविण्यासाठी ८ वर्षांपूर्वी ॲन्जीओप्लास्टी करण्यात आली होती. तसेच रुग्णाच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होत असल्याचा त्रास सुद्धा होता. त्यानंतर रुग्णास म्युकरमायकोसिस आजाराची बाधा झाली. उपचारासाठी त्यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सी-२ कक्षात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी रुग्णाच्या आजाराचे निदान झाल्यानंतर औषधोपचार सुरु करण्यात आले. या रुग्णास महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून उपचार मोफत करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर रुग्णाची शस्त्रक्रिया मंगळवारी करण्यात आली.

यामुळे जोखीम वाढली

रुग्णाचे फुफ्फुस ३८ टक्केच काम करीत असल्यामुळे रुग्णास भूल देणे अतिजोखमीचे होते. या सर्व परिस्थितीत रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यास वैद्यकीय पथकाच्या टीमला यश आले. दंत शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ.इम्रान पठाण, डॉ.श्रृती शंखपाळ, कान, नाक, घसा विभागाचे प्रमुख डॉ.अक्षय सरोदे, डॉ.हितेंद्र राऊत यांच्यासह सूक्ष्मजीव शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.किशोर इंगोले, बधिरीकरण शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. काजल साळुंखे, डॉ. सचिन पाटील, डॉ. स्वप्निल इंकणे, शल्यचिकित्सा विभागाचे डॉ. उमेश जाधव यांनी शस्त्रक्रियेत परिश्रम घेतले.