शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीला मिळणार अनुदान

By admin | Updated: March 23, 2017 00:08 IST

२ कोटी ८२ लाख रु.प्राप्त : भडगाव तालुक्यातील शेतकºयांना दिलासा

भडगाव : २०१५ मध्ये खरीप हंगामात ज्या शेतकºयांनी कापूस पिकाचा विमा काढलेला नाही. अशा शेतकºयांना शासनाकडून कापूस पिकासाठी अनुदान मिळणार आहे. यासाठी तहसील प्रशासनास २ कोटी ८२ लाख ३ हजार ५९६ रुपये रक्कम प्राप्त झाली आहे. प्रशासनाची शेतकºयांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू आहे.२०१५ मध्ये खरीप हंगामात शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली होती. त्यावेळी काही शेतकºयांनी कापूस पिकाचे विमा काढलेला होता मात्र ज्या शेतकºयांचा कापूस पिकाचा विमा काढलेला नव्हता अशा शेतकºयांना आता शासनाकडून कापूस पिकासाठी अर्थसाहाय्य अनुदान मिळणार आहे. यासाठी भडगाव तहसील विभागास २ कोटी ८२ लाख ३ हजार ५९६ रुपये अशी अनुदानाची रकम नुकतीच प्राप्त झाली आहे, यासाठी दोन हेक्टरची शेतकºयांना मर्यादा आहे. तालुक्यातील शेतकºयांना कापूस वाटपाच्या कार्यवाहीचे नियोजन सुरु असून हे अनुदान संबंधित लाभधारक शेतकºयांच्या बँकेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे अशी माहिती तहसील कार्यालयातील लिपिक गणेश नाईक यांनी दिली.अनुदान वाटपाबाबत तहसील सी.एम.वाघ यांनी मंडळाधिकारी तलाठी यांच्या बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत.  २०१५ मध्ये ज्या शेतकºयांनी खरीप हंगामात कापूस पिकाचा विमा काढलेला नाही अशा लाभार्थी शेतकºयांच्या याद्या तहसील कार्यालयात जमा कराव्यात असे आदेश तहसीलदार वाघ यांनी तलाठींना केले आहे. त्यामुळे कापूस अनुदानाचा लाभ पात्र शेतकºयांना लवकरच मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांना अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे.कापूस पिकाच्या अनुदानाचे वितरण शेतकºयांना शासन निर्णयानुसार  करण्यात येणार आहे.  तसेच अनुदान वाटप करताना महसूल मंडळाप्रमाणे  शेतकºयांना प्रति हेक्टरी देय अनुदानाचा  दर रक्कम याप्रमाणे लाभ मिळणार आहे.  यात मंडळाचे नाव व पुढे अनुदानाच्या रकमेचा दर याप्रमाणे आहे. यात  भडगाव महसूल मंडळ २३१६ रुपये प्रति हेक्टरी, कोळगाव महसूल मंडळ १९५३ रुपये कजगाव महसूल मंडळ २४७९ रुपये, आमडदे महसूल मंडळ १८६५ रुपये याप्रमाणे प्रति हेक्टरला अनुदानाचा लाभ मिळणार आहे.२०१५च्या खरीप हंगामात ज्या शेतकºयांनी कापूस पिकाचा विमा काढलेला नाही. अशा शेतकºयांना कापूस उत्पादनाचा लाभ मिळणार आहे. आतापर्यंत तहसील प्रशासनास  २ कोटी ८२ लाख ३ हजार ५९६ रुपये अनुदानाची रक्कम प्राप्त झाली आहे. नव्याने पुन्हा १ कोटी रुपये रकमेची अनुदानासाठी शासनाकडे मागणी केली आहे. - सी.एम.वाघ, तहसीलदार भडगाव