ऑनलाईन लोकमत/ सुशील देवकर
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}जळगाव,दि.30- मनपात सध्या सुरू असलेल्या स्थानिक निधी लेखा विभाग, औरंगाबाद या कार्यालयातर्फे 2014-15 या आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षणात नगररचना विभागातील कामकाजावर आक्षेप येऊ नयेत, यासाठी लेखापरीक्षकाला (ऑडीटरला) देण्याकरिता या विभागात काम करणा:या व केलेल्या सर्व अभियंत्यांनी वर्गणी करून दीड लाख रुपये गोळा करून देण्याचा निरोप नगररचनातील दोघा अभियंत्यांनी अन्य अभियंत्यांना दिला .
याबाबत नगररचनात काम केलेले सहायक नगररचनाकार व सध्या बांधकाम विभागात कार्यरत असलेले अरविंद भोसले यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. आयुक्तांनी ऑडीटरसह पैशांचा निरोप पोहोचविणा:या दोघा अभियंत्यांकडून खुलासा मागविला असून त्यानंतर याबाबत पुढील कारवाई केली जाणार आहे.
मनपात सध्या स्थानिक निधी लेखा, औरंगाबाद या कार्यालयातील लेखापरीक्षकांच्या पथकाकडून मनपातील विविध विभागांचे लेखापरीक्षण केले जात आहे. त्यात नगररचना विभागातील कामकाजाचे लेखापरीक्षण करणा:या लेखापरीक्षकाने कामकाजावर काही आक्षेप घेऊ नयेत, यासाठी त्यांना दीड लाख रुपये सर्व आजी-माजी अभियंते मिळून गोळा करून द्या, असा निरोप नगररचना विभागातील रचना सहाय्यक विजय मराठे व सहायक नगररचनाकार भास्कर भोळे यांनी नगररचना विभागातील माजी सहायक नगररचनाकार व सध्या बांधकाम विभागातील सहायक अभियंता अरविंद भोसले यांना दिला. पहिल्यांदा भोसले यांनी या निरोपाकडे दुर्लक्ष केले. आपण काहीही चुकीचे काम केलेले नसल्याने आक्षेपांची भीती आपल्याला नाही. मग पैसे कशासाठी द्यायचे? असा सवाल निरोप देणा:या अभियंत्याला केला. मात्र त्यानंतरही दोन वेळा निरोप आल्याने अखेर भोसले यांनी चित्रशाखेत बसून लेखापरीक्षण करीत असलेल्या लेखापरीक्षकाची भेट घेतली. त्यावेळी भोसले यांनी त्यांच्या कार्यकाळात मंजूर फाईल्समध्ये काय त्रुटी शोधल्या? अशी विचारणा केली. मात्र काहीही त्रुटी निघाल्या नसल्याचे संबंधित लेखापरीक्षकाने मान्य केले. मात्र तरीही काहीतरी करून टाका असे सुचविले. त्यास भोसले यांनी नकार देत थेट मनपा आयुक्तांकडेच याबाबत लेखी तक्रार केली. त्यात विजय मराठे व भोळे यांच्यासह ऑडीटरच्या नावाचा समावेश आहे. दरम्यान उपायुक्तांसमोर लेखापरीक्षक बसलेले असतानाही हा विषय झाला असून त्यावेळी लेखापरीक्षकांनी त्यांच्याकडून चूक झाल्याचे मान्य केल्याचे समजते. याबाबत आयुक्तांच्या सूचनेवरून उपायुक्तांनी संबंधित लेखापरीक्षक, तसेच मराठे व भोळे यांना नोटीस बजावून लेखी खुलासा मागविला आहे.
एलबीटी वसूल न करता परवानगी
लेखापरीक्षण कालावधित एलबीटी लागू असतानाही तो भरण्यास टाळाटाळ केल्याने बांधकाम परवानगी भोसले यांनी राखून ठेवली आहे. नंतर 50 कोटींच्या आत उलाढाल असलेल्यांची एलबीटी रद्दचा निर्णय होताच परस्पर संबंधित रोखून ठेवलेल्या बांधकाम परवानगी एलबीटी वसून न करताच आयुक्तांना विश्वासात न घेता परवानगी दिल्याचे उघड झाले असल्याचे समजते. त्यात आपण अडचणीत येऊ नये यासाठी त्यांनी सगळ्यांकडून पैसे वसूल करून देण्याचे आश्वासन लेखापरीक्षकाला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माङयाकडे भोसले यांचा लेखी तक्रारअर्ज प्राप्त झाला असून त्यानुसार उपायुक्तांना सूचना केली आहे. उपायुक्तांनी संबंधित लेखापरीक्षक, तसेच भोळे व मराठे यांना नोटीस बजावून लेखी खुलासा मागविला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
-जीवन सोनवणे, आयुक्त, मनपा.