सर्व आघाड्यांच्या याद्या सादर करा - निरीक्षक आदिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:13 IST2021-07-16T04:13:21+5:302021-07-16T04:13:21+5:30

अमळनेर : विधानसभा मतदारसंघाने राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण केली आहे. जितके प्रेम जनता देते तितके प्रेम अजित पवार मतदारसंघावर करतात, ...

Submit lists of all fronts - Inspector Adik | सर्व आघाड्यांच्या याद्या सादर करा - निरीक्षक आदिक

सर्व आघाड्यांच्या याद्या सादर करा - निरीक्षक आदिक

अमळनेर : विधानसभा मतदारसंघाने राष्ट्रवादी काँग्रेसची पाठराखण केली आहे. जितके प्रेम जनता देते तितके प्रेम अजित पवार मतदारसंघावर करतात, असे सांगून राष्ट्रवादीचे पक्ष निरीक्षक अविनाश आदिक यांनी वरिष्ठ पातळीवर पक्षाच्या अनेक आघाड्या नसल्याबाबत चुकीचा अहवाल आल्याचे सांगितले. प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. सर्व आघाड्यांच्या याद्या सादर करा, असे आवाहनही आदिक यांनी आढावा बैठकीत केले.

आमदार अनिल पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनीही मार्गदर्शन केले.

आढावा बैठकीस माजी मंत्री गुलाबराव पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, बाजार समिती मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, जि. प. सदस्या जयश्री पाटील, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, ग्रंथालय सेलचे उमेश पाटील, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहराध्यक्ष मुख्तार खाटीक, विनोद कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख भागवत पाटील, एस. बी. बैसाणे, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, शहराध्यक्ष आशा चावरिया, जि.प.चे माजी सदस्य अशोक पाटील, आशा पवार, जितेंद्र राजपूत, युवकचे तालुकाध्यक्ष विश्वास पाटील, नीलेश देशमुख, विनोद सोनवणे, प्रदीप पाटील, मनोहर पाटील, गणेश पाटील, श्रीनाथ पाटील, सुनील शिंपी, इम्रान खाटीक, लतीफ पठाण, रफीक मिस्त्री, बन्सीलाल पारधी, भुरा भोई आदी हजर होते. सूत्रसंचालन विनोद कदम यांनी केले.

Web Title: Submit lists of all fronts - Inspector Adik