शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

संचालक जयवंत भोईटेंच्या घरावर मध्यरात्री दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

फोटो लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मविप्र संस्थेचे संचालक जयवंत बाबूराव भोईटे यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री तीन तरुणांनी दगडफेक ...

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मविप्र संस्थेचे संचालक जयवंत बाबूराव भोईटे यांच्या घरावर रविवारी मध्यरात्री तीन तरुणांनी दगडफेक केल्याची घटना मुक्ताई नगरात घडली. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल न करता अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. त्यामुळे भोईटे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे.

जयवंत भोईटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संस्थेचे मानद सचिव नीलेश भोईटे यांनी केलेल्या गैरकारभाराबद्दल उच्च न्यायालय तसेच शासनाच्या विविध विभाग, पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यातून नीलेश भोईटे व त्यांच्या हस्तकांकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे. नीलेश भोईटे यांच्या सांगण्यावरून रविवारी मध्यरात्री कल्पेश भोईटे व दोन अनोळखी तरुणांनी जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक केली. खिडकीच्या काचा फोडून घरात दगड फेकले. या हल्ल्यात जयवंती भोईटेंसह त्यांच्या कुटुंबातील महिला, लहान मुले बचावली. शेजारचे लोक झोपेतून उठून बाहेर आल्यानंतर दगडफेक करणारे तिघे पळून गेले. तत्पूर्वी त्यांनी जयवंत भोईटे यांना आठ दिवसात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या घटनेनंतर भोईटे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित पोलीस कर्मचारी तायडे यांनी गुन्हा दाखल करून न घेता केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात न घेता चौकशी सुरू केली नाही. यासंदर्भात जयवंत भोईटे यांनी सोमवारी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रार केली आहे.

कोट...

आम्ही नाशिकमध्ये आहोत. न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणात सहानुभूती मिळविण्यासाठी जयवंत भोईटे यांनी केलेला हा बनाव आहे. यात तथ्य नाही.

- नीलेश भोईटे