शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

शुक्रवारपासून रोहिणी नक्षत्राला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:53 PM

शेतकऱ्यांकडून मशागतीच्या कामांना वेग

ठळक मुद्देरोहिणी नक्षत्रास शुक्रवारी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभमृग ते स्वाती नक्षत्रात यंदा मृग, आर्द्रा, पुष्प, आश्लेषा, उत्तरा, हस्त नक्षत्रावर पाऊस चांगला होईल, असा अंदाजहवामानात बदल होऊन तापमानाची तीव्रता कमी होईल

आॅनलाईन लोकमतनशिराबाद, ता.जळगाव : यंदा उच्चांकी तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे शेतकºयांसह सर्वांनाच पावसाळ्याचे वेध लागले आहे. शुक्रवार २५ मेपासून रोहिणी नक्षत्रास आरंभ होत असून वाहन घोडा आहे.रोहिणी नक्षत्रास शुक्रवारी दुपारी २ वाजून १८ मिनिटांनी प्रारंभ होत आहे. त्याचे वाहन घोडा आहे. त्यामुळे मे अखेरच्या दरम्यान किंवा जुनच्या प्रथम आठवड्यात पावसाचे अंदाज वर्तविले जात आहे. मृग ते स्वाती नक्षत्रात यंदा मृग, आर्द्रा, पुष्प, आश्लेषा, उत्तरा, हस्त नक्षत्रावर पाऊस चांगला होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे८ जून शुक्रवारी मृग नक्षत्रास प्रारंभ होईल. त्यात वाहन मेंढा आहे. या नक्षत्रात हवामानात बदल होऊन तापमानाची तीव्रता कमी होईल व पर्जन्यमान होईल.२२ जून शुक्रवारी सकाळी ११ वाजता आर्द्रा नक्षत्र सुरुवात होईल. त्याचे वाहन हत्ती आहे. ६ जुलै शुक्रवारी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांनी पुनर्वसू नक्षत्रास प्रारंभ होईल. त्याचे वाहन बेडूक आहे. त्यात ११ जुलैला गुरू मार्गी होतो. त्यामुळे काही भागात पावसाचे योग संभवतात. तथापि हा पाऊस तुटक, लहरी व खंडवृष्टिकारक राहील. मंगळ वक्रीत्वामुळे बरेच ठिकाणी ढग असूनही वृष्टी नाही असा अनुभव येईल.२० जुलै शुक्रवारी सकाळी १० वा. १४ मिनिटांनी पुष्य नक्षत्र आरंभ होईल. वाहन गाढव आहे. त्यामुळे या नक्षत्रात मध्यम पाऊस संभवतो.३ आॅगस्ट शुक्रवार सकाळी ९ वा. १२ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्र आरंभ होईल. वाहन घोडा आहे. १७ आॅगस्टला सकाळी ६ वा. ४८ मिनिटांनी मघा नक्षत्र प्रारंभ होईल. वाहन उंदीर राहील.३० आॅगस्टला मध्यरात्रीनंतर पूर्वा नक्षत्र लागेल, त्यात वाहन हत्ती आहे.१३ सप्टेंबरला रात्री पावणेनऊ वाजता उत्तरा नक्षत्रास आरंभ होईल. उत्तराच्या पावसाला महत्त्वाचे मानले जाते. दरवर्षी आपल्या जोरदार सरींची चुणूक दाखविणारे नक्षत्र यंदा मध्यम स्वरूपाचे असल्याचा अंदाज आहे.२० सप्टेंबरला हस्त नक्षत्रास आरंभ होईल.त्याचे वाहन म्हैस आहे. १० आॅक्टोबरला मध्यरात्रीनंतर चित्रा नक्षत्र आरंभ होईल. वाहन कोल्हा आहे. २४ आॅक्टोबरला स्वाती नक्षत्र प्रारंभ होईल.त्याचे वाहन मोर आहे.

टॅग्स :JalgaonजळगावRainपाऊस