शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 12:30 PM

१० आॅक्टोबरपासून उत्सव

ठळक मुद्देउपासना आदीशक्तीची१८ आॅक्टोबरला विजयादशमी

नशिराबाद, जि. जळगाव : नवरात्र उत्सव म्हणजे आदीशक्ती, आदीमाया अंबामातेच्या उपासनेचा पर्वकाल असतो. यंदा १० आॅक्टोबरपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ होत असून १८ आॅक्टोबरला विजयादशमी (दसरा) आहे. तिथींचा क्षय व वृद्धी झाल्याने यंदा नवव्या दिवशीच दसरा आहे.अवघ्या आठ दिवसांवरच नवरात्रोत्सव येऊन ठेपल्याने घरोघरी नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. देवींच्या मंदिरात साफसफाई, रंगरंगोटी आदी कामांना वेग आला आहे.शाश्वत चैतन्यांचा व उर्जेचा झरा कायम राहत ठेवणारा उत्सव नवरात्र. या कालखंडात नवदुर्गेची, आदिमाया, आदीशक्तीची उपासना करीत नवरात्र उत्सव साजरे करण्यात येत असते. यंदा १० आॅक्टोबर रोजी बुधवारी सकाळी ७ वाजून २६ मिनिटांपर्यंत प्रतिपदा आहे. त्यादिवशी घटस्थापना करावी. कुलपरंपरेनुसार देवीची प्रतिष्ठापना करीत घटस्थापन करावे.यंदा प्रतिपदा तिथीचा क्षय झाला असून षष्ठी तिथीची वृद्धी झालेली आहे. त्यामुळे १३ रोजी ललिता पंचमी व्रत व पंचरात्रोत्सवारंभ आहे.१४ रोजी सरस्वती आवाहन दुपारी १ वाजून १४ मिनिटानंतर असून १५ रोजी सरस्वती पूजन, १६ रोजी त्रिरात्रोत्सारंभ महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) आहे. १६ रोजी मंगळवारी सकाळी १० वाजून १७ मिनिटानंतर अष्टमी असून १७ रोजी बुधवारी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत अष्टमी आहे. यादिवशी दुर्गाअष्टमी, महाअष्टमी उपवास, सरस्वती बलिदान आहे. १८ रोजी महानवमी, देवीला बलिदान व विजयादशमी (दसरा) आहे.१८ आक्टोबरला गुरुवारी नवमी तिथी समाप्ती दुपारी ३ वाजून २९ मिनिटाला होत आहे. त्यानंतर अपराण्हकाळात थोडावेळ दशमी असून श्रवण नक्षत्रसुद्धा असल्याने श्रवणयोग होत आहे. त्यामुळे नवमीच्या दिवशीच विजयादशमी दिलेली आहे असे पंचागात नमूद आहे.नवरात्रोत्सवात घटस्थापना, अखंड दीप, नामजप, स्त्रोत्रपठण, दुर्गासप्तशतीपाठ वाचन, सुक्त पठण, उपवास, कुमारिकापूजन, होम-हवन आदी उपासनेला अनन्य महत्त्व आहे. या काळात अनवाणी चालणे, नक्तप्रत भोजन भाविक करीत देवीला आळवणी करतात. प्रसन्नतेची प्रार्थना व्यक्त केली जाते.

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJalgaonजळगाव