महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरटे पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 21:12 IST2021-01-15T21:12:01+5:302021-01-15T21:12:17+5:30
जळगाव : शिवाजीनगर हुडकोतील रहिवासी विजया पवार या गुरुवारी काव्यरत्नावली चौकात आल्या होत्या. काव्यरत्नावली चौकात ते आकाशवाणी चौक दरम्यान ...

महिलेच्या हातातून मोबाईल हिसकावून चोरटे पसार
जळगाव : शिवाजीनगर हुडकोतील रहिवासी विजया पवार या गुरुवारी काव्यरत्नावली चौकात आल्या होत्या. काव्यरत्नावली चौकात ते आकाशवाणी चौक दरम्यान ॲक्सीस बँकेजवळून पायी जात असताना २० ते २५ वयोगटातील अज्ञात दोन भामटे दुचाकीवर येवून विवाहितेच्या हातातून मोबाईल बळजबरी हिसकावून दुचाकीवरून पळून गेले. महिलेले आरडा ओरड केली मात्र तोपर्यंत दोघे पसार झाले होते. विजया पवार यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल आहे.