शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 15:41 IST2025-07-22T15:39:04+5:302025-07-22T15:41:46+5:30

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी आंदोलनस्थळी जाऊन आमदार पाटील यांना ताब्यात घेतले.

Shinde's Shiv Sena MLA Chandrakant Patil taken into custody by police, Muktai Nagar closed | शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद

शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद

मुक्ताईनगर (जि.जळगाव) : इंदूर - हैद्राबाद महामार्गात जाणाऱ्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करणारे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत आंदोलन करणारे शेतकरी व कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. खामखेडा पुलानजीक मंगळवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आमदार पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पडसाद मुक्ताईनगर शहरात उमटले असून, दुपारी दीड वाजता मुक्ताईनगर बंद पुकारण्यात आले. दुपारी दोन वाजेच्या  सुमारास मुक्ताईनगर कडकडीत बंद झाले.

आंदोलन रोखण्यासाठी  राखीव दलाच्या चार  तुकड्यांना येथे पाचरण करण्यात आले होते. अपर पोलीस अधीक्षक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कुष्णत पिंगळे यांनी प्रथम आंदोलकांशी संवाद साधला नंतर आंदोलकांना ताब्यात घेतले. आमदार पाटील यांना ताब्यात घेतले तेव्हा वातावरण तापले होते आमदारांसोबत जवळपास ६० कार्यकर्त्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Shinde's Shiv Sena MLA Chandrakant Patil taken into custody by police, Muktai Nagar closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.