शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीला अपघात; पोलीस व्हॅनची धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2023 20:06 IST2023-08-06T20:05:56+5:302023-08-06T20:06:10+5:30
जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीला अपघात झाला आहे.

शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीला अपघात; पोलीस व्हॅनची धडक
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटलांच्या गाडीला अपघात झालाय. अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडी जवळ हा अपघात घडलाय. आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा रक्षकांच्या पोलीस व्हॅनने त्यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात सुदैवाने चिमणराव पाटलांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटलांच्या कारचे नुकसान झाले आहे.