शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावातील शिवकॉलनी थांब्यावरील साईडपट्या उठल्या जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 12:25 IST

दररोज लहान-मोठे अपघात

ठळक मुद्देमहामार्गाच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्षमाजी उपप्राचार्यांचा घेतला होता बळी

जळगाव : महामार्गावर दररोज लहान मोठ्या अपघातांची मालिका सुरू असलेल्या शिवकॉलनी थांब्यावरील साईडपट्ट्या नागरिकांच्या जीवावर उठल्या आहेत. अत्यंत वर्दळीच्या महामार्गावरील हा थांबा असला तरी तेथील साईडपट्याच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याने या भागातील नागरिक संतापदेखील व्यक्त करीत आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर शहरातील महत्त्वाचा थांबा असलेल्या शिवकॉलनी थांब्याजवळ अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारीदेखील भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीस धडक देत घरी जात असलेल्या सुरेखा सुभाष सनेर (वय ४३, रा. श्रीसमर्थ नगर, खोटे नगर) या महिलेला चिरडल्याची घटना दुपारी शिवकॉलनी थांब्यानजीक घडली होती. या अपघातात या महिलेचा जीव जावून भाऊ विकास भटू सोनवणे हे जखमी झाले. अशा नित्याच्या अपघातामुळे या थांब्यानजीकच्या साईडपट्ट्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी ‘लोकमत’ने या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली असता या ठिकाणी आजूबाजूने येणाऱ्या रस्त्यावरून महामार्गावर लागताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे व त्यात अनेकांचे तोल कसे जातात हेदेखील दिसून आले.चार रस्त्यावरून चढताना कसरतशिवकॉलनी थांब्याजवळ धुळ््याकडे जाताना डाव्या बाजूला दोन तर उजव्या बाजूला दोन रस्ते महामार्गाला लागतात. यामध्ये डाव्याबाजूला १०० फुटी रस्त्याकडे व शिवकॉलनीत रस्ता जातो तर उजव्या बाजूला गणेश कॉलनी व गणेश कॉलनी थांब्याकडे रस्ता जातो. या चारही रस्त्यावरून महामार्गावर दुचाकी असो की रिक्षा किंवा इतर कोणतेही वाहने महामार्गावर लागताना त्यांना कसरत करावी लागत असल्याचे दिसून आले. या रस्त्यांवरून महामार्गावर लागताना चढ असल्याने वाहनधारक वेगाने येतात व ऐन डांबरी महामार्गाच्या साईडपट्ट्या खराब असल्याने त्यावरून दुचाकी घसरल्या जातात तसेच त्यांचे तोल जाऊन ते खालीदेखील पडतात. आजही एक दोन जणांचा अशाच प्रकारे येथे तोल गेला मात्र त्यांनी पाय खाली टेकवत वाहनावर नियंत्रण मिळविले.गतिरोधकांची दुरवस्थाऐन थांब्याजवळच गतिरोधकाचीही दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या बाजूला डांबर वर येऊन उंच वटा तयार झाल्याने व गतिरोधकही ओबड-धोबड असल्याने अपघातास निमंत्रण मिळते. त्यामुळेही येथे अपघात वाढत असल्याचे या ठिकाणी सांगण्यात आले.अभियांत्रिकी ते शिवकॉलनी दरम्यान कसरतीशिवकॉलनी थांब्याशिवाय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ते शिवकॉलनी थांब्यापर्यंत महामार्गावर येणारे आठ रस्ते आहे. या ठिकाणाहून येतानावाहनेवेगानेयेतात व त्यात घात होऊन त्यांच्या जीवावर बेतते. त्यासाठी साईड पट्यांचे काम करण्याची मागणी होत आहे.रस्त्यावर बस थांबल्याने अडचणीधुळ््याकडून जळगावकडे येणाºया बसेस शिवकॉलनी थांब्यावर थांबल्यानंतर बसच्या पुढून अथवा मागून बाजूने येणाºया या रस्त्यांवरून दुचाकीस्वार महामार्गावर येत असल्यास त्याला महामार्गावरील वाहन दिसत नाही व ऐन रस्त्यावर लागताना ते दिसल्यास ब्रेक दाबताच साईडपट्ट्यांवरून वाहने घसरतात. त्यामुळे बस थांब्याकडेही लक्ष देण्याची मागणी होत आहे.माजी उपप्राचार्यांचा घेतला होता बळीखराब साईड पट्ट्यांमुळे शिवकॉलनीनजीक दोन वर्षापूर्वी मू.जे. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य प्रा. व्ही.जे. चौधरी यांचा अपघात होऊन त्यांना जीव गमवावा लागला होता. अशाच प्रकारे लहान मोठ्या अपघातात कोणी जखमी होते तर कोणाच्या जीवावर बेतणे नेहमीचे झाले आहे.समांतर रस्ते होणे गरजेचेसाईडपट्या खराब झाल्या असल्या तरी समांतर रस्ते होत नसल्याने या भागातील रहिवाशी संताप व्यक्त करीत आहे. समांतर रस्त्यांसाठी आंदोलनेदेखील झाले, मात्र त्याची अद्यापही दखल घेतली जात नसल्याने समांतर रस्त्यासाठी अजून कोणाचे बळी जाण्याची वाट पाहिली जात आहे का असाही सवाल उपस्थित केला जात आहे.शिवकॉलनी थांब्यानजीकच रस्त्याच्या साईडपट्या खराब झाल्याने अपघात होत आहे. त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.- रमेश पाटील, रहिवाशी, शिवकॉलनीमहामार्गावर लागताना चारही रस्त्याने वाहने वेगाने येतात. मात्र साईडपट्या खराब असल्याने वाहने घसरतात. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.- सुभाष काळे, रहिवाशी, शिवकॉलनीआम्ही गणेश कॉलनी भागातून शिवकॉलनीकडे आलो तर रस्त्यावर लागताना मोठी कसरत करावी लागते. यातून अपघात होतात.- राजेंद्र शिंदे, रहिवाशी, गणेश कॉलनी१०० फुटी रस्त्याकडून येताना महामार्गावर लागायचे झाल्यास येथे मोठी वर्दळ असते. त्यात रस्त्याच्या कडेला तोल जाण्याची भीती असते.- योगेश जाधव, रहिवाशी, शिवकॉलनी.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव