शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

पालिकांमध्ये निरर्थक प्रयोगाची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:44 IST

महाविकास आघाडी सरकार आल्यावर ‘लोकनियुक्त’ला खो; पण पालिकांमधील कारभार सुधारणार का हा प्रश्न, पक्ष बदलतात परंतु वर्षानुवर्षे त्याच घराण्यांची पालिकांमध्ये सत्ता; नगरसेवक तेच आणि अधिकारीदेखील तेच

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑात सरकारे बदलली की, धोरणे बदलतात हा सार्वत्रिक अनुभव आहे. २००१ मध्ये काँग्रेसची सत्ता असताना लोकनियुक्त नगराध्यक्षाचा निर्णय झाला. प्रत्यक्षात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातुरात राष्टÑवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष झाला. जळगावातही तसेच घडले. बहुमत एका पक्षाचे तर नगराध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा, अशा स्थितीमुळे विकासावर परिणाम झाला. पुढे सरकारने हा निर्णय बदलला. भाजप-शिवसेना युती सरकारने हा निर्णय पुन्हा अंमलात आणला. त्याचा लाभ भाजपला अधिक झाला. महाविकास आघाडीने आता तो निर्णय बदलला.राष्टÑपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ असे आवाहन केले असले तरी वास्तव असे आहे की, शहराकडे लोंढे वाढत आहेत. काही शहरांची तर नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता संपलेली आहे, पण तरीही आजूबाजूची खेडी समाविष्ट करुन पालिकांचे कार्यक्षेत्र फुगविण्याचे खटाटोप सुरु आहेत. एवढ्या लोकसंख्येला मुलभूत सुविधा पुरवता येण्याइतकी पायाभूत रचना या शहरांमध्ये नाही. बकालपण अधिक वाढत चालले आहे. शिक्षण, रोजगाराची संधी असल्याने खेड्यातून शहराकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहेच. दुष्काळ-अतिवृष्टीमुळे शेतीवर झालेला परिणाम, पाणी-वीज-आरोग्याची ग्रामीण भागात असलेली दुरवस्था पाहता उच्चभ्रू व मध्यमवर्गीय नागरिकदेखील शहरात दुसरे घर करण्यास प्राधान्य देताना दिसत आहेत.नव्या नागरिकांना सामावून घेण्याची क्षमता संपत आल्याने शहरांमध्ये नव्या समस्या निर्माण झाल्या आहेत. ग्रामीण भागातून लोक येत असल्याने बिल्डर लॉबी, टँकर लॉबी, वाळू लॉबी प्रभावशाली झाली आहेत. या लॉबीचे हितसंबंध जपणारी मंडळी पूर्वी पालिकांमध्ये सत्तास्थानी असत. पुढे हीच मंडळी पालिकांमध्ये शिरली आणि पालिकांचे कार्यक्षेत्र वाढविणे, विकास नियमावली मंजूर करणे, विकास योजना राबविणे अशा बाबी मनमानी पध्दतीने होऊ लागल्या. हा प्रभाव तर आता एवढा वाढला की, नवे घर बांधण्यासाठी परवानगी घेण्यापासून तर घर पूर्णत्वाच्या दाखल्यापर्यंत भ्रष्टाचाराची साखळी तयार झाली आहे. राजपत्रित अधिकारी जरी मुख्याधिकारी, आयुक्त म्हणून नियुक्त झाला तरी त्यांच्यासोबत काम करणारी यंत्रणा ही स्थानिक असते. नगरसेवक मंडळींचेच नातलग असलेल्या या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेणे हे बाहेरील अधिकाºयाला जिकीरीचे ठरते. या सगळ्या प्रकारातून राज्यभरात शहरांची पुरती वाट लागलेली आहे.केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा, घरकूल, मल: निस्सारण, स्वच्छ भारत अभियान अशा योजना राबवित असताना वर्षानुवर्षे तेच ठेकेदार दिसून येतील. कंपन्यांची नावे बदलतील, परंतु मालक तेच असतात. अर्धवट कामे ठेवणे, निधी हडपणे, यंत्रसामुग्री घेऊन पोबारा करणे असे प्रकार हमखास दिसून येतात. पालिकेपासून थेट मंत्रालयापर्यंत साखळी असल्याने कोणत्याही ठेकेदाराला शिक्षा झाल्याचे उदाहरण दिसून येत नाही.राज्यात ज्या पक्षाचे सरकार येते, त्या पक्षाची सत्ता पालिकेत येते. कारण होकायंत्राप्रमाणे दिशा आणि टोपी बदलणारे नगरसवेक ठिकठिकाणी आहेत. राजकीय पक्षांनाही स्वबळ वाढल्याचे तात्कालीक समाधान मिळते. पण वास्तव वेगळेच असते, याचा अनुभव पूर्वी काँग्रेसने तर आता भाजप घेत आहे. तूर्त तरी या प्रश्नावर तोडगा दिसत नाही, हे सामान्यांचे दुर्देव म्हणायला हवे.राज्य सरकारने प्रभाग पध्दती, एक सदस्यीय पध्दती असे बदलदेखील करुन पाहिले. प्रयोग होतात, पण त्याचा सकारात्मक परिणाम दिसत नाही. याला मूळ कारण असे आहे की, प्रत्येक शहरात मोजक्या पाच-दहा घराण्यांमध्ये पालिकेची सत्ता केंद्रित झाली आहे. आरक्षण आले की, त्याच कुटुंबातील व्यक्ती उपनगराध्यक्ष होऊन सत्ता आपल्याच हाती ठेवते. अधिकारी आणि कर्मचारीदेखील नगरसेवक मंडळींचे नातलग आहेत. शहरांचा विकास ठप्प आणि नागरिकांची नाडवणूक हे चित्र कायम आहे.

 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव