जळगावात सलग दुसऱ्या दिवशी वाळूच्या डंपरने दुचाकीस्वाराला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 20:07 IST2018-06-30T20:04:04+5:302018-06-30T20:07:30+5:30
भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने बेंडाळे चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत डिगंबर गोविंद खडके (वय ७२, रा.भवानी पेठ, जळगाव) या दुचाकीस्वार वृध्दाला उडविल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.

जळगावात सलग दुसऱ्या दिवशी वाळूच्या डंपरने दुचाकीस्वाराला उडविले
ठळक मुद्देजळगाव शहरातील बेंडाळे चौकातील थरारअपघातात पत्नी व नात बचावलीसंतप्त जमावाकडून डंपरची तोडफोडवाळूची वाहने उठली जीवावर
जळगाव : भरधाव वेगाने आलेल्या वाळूच्या डंपरने बेंडाळे चौकात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत डिगंबर गोविंद खडके (वय ७२, रा.भवानी पेठ, जळगाव) या दुचाकीस्वार वृध्दाला उडविल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या अपघातात खडके यांचा पाय निकामी झाला असून पत्नी व नात नशिबाने बचावले आहेत.
संतप्त नागरिकांना डंपरच्या काचा फोडल्या असून जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला. जमावाचा संताप पाहता डंपर चालकाने तेथून पळ काढला. दरम्यान, कालच इच्छादेवी चौकात एका भरधाव वाळूच्या ट्रकने सिग्नल यंत्रणेला उडविले होते. त्यानंतर सलग दुसºया दिवशी ही घटना घडली.