शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

नगरसेविका पतीने अडविली स्कूल बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:16 PM

पोलिसात तक्रार : आदर्श नगरात पाऊण तास विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण

जळगाव : आपल्या गल्लीतून जाणारी शाळकरी मुलांची बस भाजप नगरसेविकेच्या पतीसह पाच ते सहा रहिवाश्यांनी अडविल्याची तक्रार रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलच्या व्यवस्थापनाने केली आहे. मंगळवारी सकाळी ८़१५ वाजता आदर्शनगरातील लायन्स हॉलजवळ तब्बल पाऊण तास ही बस अडवून ठेवण्यात आल्यामुळे मुलांना शाळेत जाण्यास उशिर झाला़ अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर बस मार्गस्थ झाली़याबाबत स्कूल प्रशासनाकडून नगरसेविका पती बाळासाहेब चव्हाण, मनीष चव्हाण, आकाश चव्हाण, नथ्थु चौधरी, प्रवीण मुळे यांच्यासह इतरांविरूध्द रामानंदनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे़स्कूल प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले की, जळगाव-शिरसोली रस्त्यावर असलेल्या रूस्तमजी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी सकाळी ७ व नंतर ८ वाजेच्या सुमारास शाळेतील स्कूल बस सोडण्यात येत असते़शाळकरी मुलांना मुख्य रस्त्यांवर न बोलविता बस ही विद्यार्थ्यांना घराच्या काही अंतरापर्यंत घेण्यासाठी येत असते़ त्यानुसार मंगळवारी बसचा चालक हा एमएच़१९, वाय़ ७००२ क्रमांकाची बस घेऊन सकाळी ८़१५ वाजेच्या सुमारास आदर्शनगरातील लायन्स हॉलजवळील गल्लीतून विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना भाजप नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती बाळासाहेब चव्हाण तसेच मनीष उमेश चव्हाण, आकाश उमेश चव्हाण, नथ्थु बारकू चौधरी, प्रवीण मधुकर मुळे यांच्यासह काही रहिवाश्यांनी बस अडवून आमची वाहने येथे उभी राहतात, गल्लीतून बस जाऊ देणार नाही, असे म्हणत चालकाशी अरेरावी करीत शिवीगाळ केली.हा वाद पाहून विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते़स्कूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळीया प्रकाराची माहिती चालकाने स्कूल प्रशासनाला कळविली. यावर स्कूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तत्पूर्वी पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी रहिवाश्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला़पोलिसात दिली तक्रारशाळेची बस अडवून अर्वाच्च भाषेत कर्मचाऱ्यांशी बोलून शिवीगाळ केली म्हणून मंगळवारी सकाळी बस निरिक्षक सुनील एकनाथ पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात नगरसेविका पती बाळासाहेब चव्हाण, मनीष चव्हाण, आकाश चव्हाण, नथ्थु चौधरी, प्रवीण मुळे यांच्यासह इतरांविरूध्द तक्रार दिली.आधीही दिली धमकीशुक्रवार, ८ रोजी सुध्दा लायन्स हॉल परिसरातील याच रहिवाश्यांकडून बस अडवून आपल्या गल्लीतून बस घेऊन जायची नाही, अशी धमकी दिली होती़, असेही तक्रारीत म्हटले आहे़ दरम्यान, गल्लीत वाहने उभी असतात, त्यांना धडक बसेल या कारणाने बस अडविण्यात आल्याचा रहिवाशांचा दावा असल्याचे कळते.तब्बल पाऊण तास विद्यार्थी खोळंबले...तब्बल पाऊण तास ही बस अडविण्यात आली़ यामुळे शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना उशिर झाला. संपूर्ण प्रकाराची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी रहिवासी बस अडवू शकत नाही, अशी तंबी दिली आणि समजूत घातली़ 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव