शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

वाळू साठे, योजनांमधील गैरव्यवहाराची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:19 IST

शासकीय योजना राबविताना त्यात कोठे ना कोठे, काही ना काही गैरव्यवहार होणे आता जणू नित्याचेच झाले आहे. जिल्ह्यातील वाळू ...

शासकीय योजना राबविताना त्यात कोठे ना कोठे, काही ना काही गैरव्यवहार होणे आता जणू नित्याचेच झाले आहे. जिल्ह्यातील वाळू साठ्यांमध्ये गैरप्रकार होत असताना कोरोना संकटातही शासकीय योजनांमध्ये गैरव्यवहार होऊन त्याच्या चौकशीचे आदेश निघत आहे. अशाच प्रकारे आता महिला बचत गटांना काम मिळावे म्हणून मानव विकास मिशनमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात कापडी पिशवी युनिट साहित्याच्या खरेदीत गैरव्यवहाराच्या संशयावरून तक्रार झाली व त्याविषयी चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळूच्या साठ्यांमध्ये गैरप्रकार होत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. यात जळगाव-औरंगाबाद महामार्गाच्या कामात मर्यादेपेक्षा अधिक वाळूचा साठा आढळून आल्याने संबंधित ठेकेदाराला तब्बल ३८ लाखांपेक्षा अधिक दंड ठोठावण्यात आला. या दंडाच्या रकमेवरूनच लक्षात येते की, किती मोठ्या प्रमाणात वाळूमध्ये गैरव्यवहार होत असतील. विशेष म्हणजे शासकीय ठेक्यामध्ये एवढी वाळू असू शकते तर खासगी व्यक्तींकडून किती साठा केला जाऊ शकतो, याचाही अंदाज येऊ शकतो. या वाळूसाठ्यासह दापोरा शिवारातदेखील कोणतीही परवानगी न घेता वाळू साठा केल्याचे व तोही मातीमिश्रित असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी तहसीलदारांनी नोटीस बजावली. याशिवाय मेहरुण परिसरातील साठा, औद्योगिक वसाहत परिसरातील साठा असे अनेक वाळूचे साठे आढळून आले. वाळूमध्ये असे गैरप्रकार सुरू असताना आता शासकीय योजनांमधील गैरव्यवहाराची चौकशी सुरू आहे. महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत जिल्ह्यात कापडी पिशवी युनिट साहित्य, शिलाई मशीन, कटिंग मशीन इतर साहित्याची खरेदी करण्यात गैरव्यवहार असल्याच्या संशयावरून या खरेदीच्या चौकशीची मागणी झाली. या खरेदीमध्ये खरेदी केलेले साहित्य बाजार मूल्यापेक्षा जास्त किमतीत खरेदी केल्याचा संशय व्यक्त करीत काही मुद्द्यांवर प्रशासकीय मान्यतेचे उल्लंघन केल्याचाही आरोप होऊ लागला. याविषयी तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले. चौकशीत काही बाबींमध्ये अनियमितता आढळून आली असल्याचेही तक्रारदाराचे म्हणणे आहे. एकीकडे कोरोनाचे संकट असताना यंत्रणा त्यात अडकते. तरीदेखील काही ठिकाणी गैरव्यवहार, गैरप्रकार थांबत नसल्याचे वारंवार पुढे येत आहे. एकूणच स्थिती पाहता वाळू साठे असो की शासकीय योजनांमध्ये गैरव्यवहाराची संधी कोठे सोडली जात नाही, असेच दिसून येते.