चाळीसगाव शहरात रेड्यांचा 'सगर'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2023 20:00 IST2023-11-14T19:58:22+5:302023-11-14T20:00:19+5:30
गवळी बांधवांनी आपल्याकडील रेडे सजवून आणले होते.

चाळीसगाव शहरात रेड्यांचा 'सगर'
जिजाबराव वाघ
चाळीसगाव शहरात गवळी समाजाच्यावतीने भडगावरोडसह हिरापूर रोड, नेताजी चौक, गणेश रोड आदी भागातून मंगळवारी दुपारी ४ वाजता रेड्यांचा सगर काढण्यात आला. यासाठी गवळी बांधवांनी आपल्याकडील रेडे सजवून आणले होते.
भडगावरोड जवळील डॉ.पूर्णपात्रे विद्यालयापासून निघालेल्या रेड्यांच्या मिरवणुकीत डिजेचा दणदणाटही होता. रेड्यांची पूजा करुन हिरापूर रोड लगत तितूर नदीपात्रात मिरवणुकीची सांगता झाली. संध्याकाळी रेड्यांचा सगर भरवण्यात आला होता. सगरची मिरवणूक संपल्यानंतर भावाच्या दीर्घायुष्यासाठी बहिणीने धरलेला उपवास सोडला जातो. तसेच भावाला काजळ लावून औक्षण केले जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
चाळीसगाव शहरात गवळी बांधवांची मोठा रहिवास आहे. ठिकठिकाणी गवळीवाडे असून मोठ्या संख्येने म्हशींचे पालन केले जाते. सगर उत्सवात धष्टपुष्ट रेडे आणि त्यांचे भेदक रुपडे पाहण्यासाठी लोक गर्दी करीत असतात.