शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

पीएम स्वनिधीसाठी फेरीवाल्यांच्या बँकांमध्येच फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी योजना आणली. त्यात बँका फेरीवाल्यांना दहा हजार रुपये कर्ज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी योजना आणली. त्यात बँका फेरीवाल्यांना दहा हजार रुपये कर्ज देणार आहेत. त्यानुसार सर्व फेरीवाल्यांना कर्ज मिळणार होते. मात्र, त्याला बँका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची आडकाठी आहे. बोदवड तालुक्यात तर या पीएम स्वनिधीला फारसा प्रतिसाद नाही. बोदवडला आतापर्यंत एकाही फेरीवाल्याला कर्ज मिळाले नसल्याची माहिती समोर आली आहे.

सप्टेंबर महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात या योजनेला सुरुवात झाली. पहिल्या दिवसापासूनच योजनेचे बारा वाजले आहेत. सुरुवातीला बँकांची कर्ज देण्यासाठी आडकाठी होती. अनेक प्रकरणांना सुरुवातीला अडचणी येत होत्या. आधी महापालिका फेरीवाल्यांना संमतीपत्र (लेटर ऑफ रिकमेंडेशन) देण्यास तयार नव्हती. अनेक तक्रारीनंतर संमतीपत्र मिळायला सुरुवात झाली. ज्या अर्जदाराकडे लेटर ऑफ रिकमेंडेशन असेल त्याला इतर कागदपत्रांची फारशी गरज पडत नाही, असे असले तरी प्रत्येक बँक अर्जदाराला आपले स्वतंत्र नियम लावत आहे. खासगी बँकांनाही पीएम स्वनिधी देणे बंधनकारक असले तरी खासगी बँकांनी हे बंधन तोडून टाकले आहे. आमची बँक या योजनेसाठी फारशी इच्छुक नसल्याचे सांगून फेरीवाल्यांची बोळवण केल्याचेही समोर आले आहे.

बँकांनाही दिले लक्ष्य

जिल्ह्यातील सर्व बँकांना यासाठी लक्ष्य देण्यात आले आहे. अनेक ठिकाणी अर्जदारांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बँकेचे कर्मचारी मदत करतात. अनेक ग्राहकांना क्यूआर कोड आणि त्याद्वारे मिळणाऱ्या सुविधांची माहिती नसते. तीदेखील बँकेचे कर्मचारी त्यांना देत आहेत.

-अरुण प्रकाश, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक

बँकांकडून मिळणाऱ्या व्यवहाराने फेरीवाले नाखुश

सुरुवातीला मी एका खासगी बँकेत अर्ज घेऊन गेलो. मात्र, त्यांनी कर्ज नाकारले. त्यामुळे आता एका राष्ट्रीयकृत बँकेत अर्ज केला आहे. तेथेही फिरवले जात आहे. त्यामुळे योजनेचा फायदा अजूनही मिळालेला नाही. कोरोनाच्या काळात व्यवसायात मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे तो उभा करण्यासाठी अर्थसाहाय्य गरजेचे आहे.

-मोहम्मद युसूफ शेख, फेरीवाले

अनेक वेळा बँकेत खेटे मारावे लागले. मात्र, आता अखेरीस कर्ज मिळाले आहे. त्यासाठी क्यूआर कोड तयार करावा लागला. व्यवसायासाठी आर्थिक मदतीची गरज होती. मात्र, ही गरज आता पूर्ण झाली आहे. त्याचे हप्तेदेखील नियमित भरणार.

-बाळू महाजन, फेरीवाले

माझे कर्ज मंजूर झाले आहे. मात्र, भावाचे कर्ज प्रकरण सिबील स्कोअरचे कारण सांगून पुढे ढकलले आहे. कोरोनाच्या काळात व्यवसाय बंद होता. त्यामुळे आता तरी व्यवसाय पूर्ववत करण्यासाठी अर्थसाहाय्य गरजेचे आहे. या योजनेत बँकांमध्ये मात्र फिरावेच लागते.

-महेश बाविस्कर, विक्रेता

फेरीवाल्यांनी कर्जासाठी केलेले अर्ज

३७,५४६

फेरीवाल्यांना योजनेमधून कर्ज झाले मंजूर

२,२३८

तालुकानिहाय आकडेवारी

अर्ज मंजूर कर्ज वितरित

जळगाव महापालिका- ३,१८४ १,३१० ९८१

अमळनेर ४७८ २१९ १५३

जामनेर ४६६ १३६ १०१

पाचोरा ३०९ ४७ ८

पारोळा १,०११ २०६ १२३

एरंडोल २५४ १२१ ६६

भडगाव २२३ १३७ ९१

चाळीसगाव १,१६३ ४४३ ३२७

रावेर २१५ ९७ ६०

मुक्ताईनगर १७९ ३३ ८

यावल २०४ १६२ ७०

बोदवड ९६ १४ ०

भुसावळ १,२७४ २८१ १६६

चोपडा २३० ७८ ४९

धरणगाव २६० १३३ ७३