कष्टकऱ्यांच्या परिश्रमाला रोटरीचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 20:41 IST2021-03-12T20:41:49+5:302021-03-12T20:41:49+5:30
जळगाव : रोटरी क्लब, जळगावतर्फे नुकतीच रोटरी कम्युनिटी कॉर्प समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दाणाबाजार येथील गरीब, होतकरू ...

कष्टकऱ्यांच्या परिश्रमाला रोटरीचा मदतीचा हात
जळगाव : रोटरी क्लब, जळगावतर्फे नुकतीच रोटरी कम्युनिटी कॉर्प समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दाणाबाजार येथील गरीब, होतकरू हमाल बांधवांना मदतीचा हात देऊन हातगाडीचे वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या काळात कष्टकरी जनतेसमोर आर्थिक अडचणी येत आहेत. स्वाभिमानाने काम करणाऱ्या हमाल बांधवांना मदत व्हावी या हेतूने रोटरी क्लब, जळगावने या उपक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमांतर्गत हमाल बांधवांना हातगाडीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ह्यरोटरीह्णचे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, किशोर तलरेजा, डॉ. तुषार फिरके, मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, ॲड. श्रीकांत भुसारी, राजू आडवाणी, आसिफ मेमन, दिलीप जैन, श्याम अग्रवाल, आशुतोष पाटील, मनीष झंवर, शेषराव अप्पा वेलकर व दाणाबाजारातील हमाल बांधव उपस्थित होते.